दूर तक छाए थे बादल कही साया नहीं था
इस तरह बरसात का मौसम कभी आया न था-
कामावरुन घरी न जाता डायरेक्ट तालमीला किंवा वादनाला येतो तो वादक. आगमन सोहळा जवळ आलाय वादन एकदम सुरळीत पार पडल पहिजे ह्या विचाराने ज्याला रात्रीची ज़ोप येत नाही तो वादक.मोठ मोठी ढोल बांधून वादनात तलीन होतो तो वादक हातांच्या बोटांचा विचार न करता ताशा ची तर्री तर्री देतो तो वादक. मानाचा ध्वाज नाचवताना समोरच्या माणसाच्या आंगवार काटा आणायला मजबूर करतो तो वादक आणि ज्याच्या परफ़ेक्ट टोल मुळे अख्खं वादन बरोबर होत तो वादक. मेहनत आणि परंपरेवर ज्याच मनापासून प्रेम असत ना तो खरा वादक. वादकाला एक शाबासकीची थाप पुरे असते. त्याला पैसे महत्त्वाचे नसतात, त्याच वादन छान झाल की त्याला जगातलं दुसरं कुठलं ही आनंद फिकुत्र . रुद्रा ढोल ताशा पथक म्हटलं कि विषय संपला .मराठी संस्कृती जोपासत ढोल ताशा पथकची आपली जुनी परंपरा जोपासत चालेल आमचं पथक. आमच्या पथकाचा पथक प्रमुख विकी दादाचा आवाज आला म्हणजे सगळे सावध होणार सगळ्यांच लक्ष मग त्याच्याकडे असणार. इकडे भाविक दादा ने आवाज केला मागे वळून कि समजून जायचं ठोका चुकलाय कोणचा तरी पुढे बघ मागे बघितलस ना तर टिपरु फेकून मारेल .सौमिल दादाकडे लक्ष द्यायचं म्हणजे ठोका चुकत नाही .
-
आस😍 लागली आहे बाप्पा तुझ्या या आगमनाची हातात टिपरू घेऊन उभा आहे तुझ्या हा वेडा वादक वाट पाहतोय श्री गणेश चतुर्थीची 🙏 .
-
एक वादक....
वादक म्हणजे नक्की कोण? वादक म्हणजे नक्की कोण असतो? त्याला काय मिळत वादन करून ? त्याला असं रस्त्यावर ढोल वाजवायला लाज नाही वाटत का? त्याला घरदार नाही का? आणि असे किती पैसे मिळतात वादन करून? कशाला नको त्या गोष्टी करायच्या. हे अशी खुप सारे प्रश्न पडत असतील ना तुम्हाला, नेमकं वदकाला वादन करून काय मिळत. उत्तर आहे माझ्याकडे. तुम्हाला जे थिल्लर चाळे वाटत ना अम्हाला ते आमची परंपरा वाटते. कमरेला जेव्हा ढोल किंवा ताशा असतो, हातात मानाचे ध्वज असतो, टोल च्या गाडीवरून टोल वाजवण्यात जो आनंद मिळतो ना ते तुम्हाला स्वतः अनुभवल्या शिवाय नाही कळणार. आमचा बाप्पा येणार म्हणून त्याच्या आगमनासाठी केलेली दोन महिने आधीची तालीम, बाप्पाच्या आगमनाला वाजवण्याचा सुख या पेक्षा जगात भारी काही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना ढोल-ताशा पथका द्वारे दिलेली मानवंदना ह्याचा आनंद तुम्हाला नाही कळणार ओ. मुल रिकामटेकडी आहेत म्हणून बोलणारी लोक आणि मुलींनी काय रस्त्यावर ढोल वाजवायची अशी बोलणारी लोक कधी काळा सोबत पुढे जाऊ शकणार नाही. काय वाटत तुम्हाला वादक बन सोप असत? ......-
गगन दादा मंगेश दादा गोपाळ ताशावर आपली कमाल दाखवतात. मी, मनीष, निलू दादा, मनीष दादा, शुभम पत्रकार , अक्षय दादा, आकाश आवाज काढायला .मुलींच्यात सोना ताई अख्खा वाघ आहे कोणालाच ऐकणार नाही ढोल बांधला की तेवढंच मुलींना सांभाळून घेऊन लक्ष देणारी. मागे संध्या दीदी मानसी दीदी सोबत आहेच तिच्या .बाकी सगळी मुलं मुली आपला मौलाचा वाटा चालवत पुढे येत आहेत. ढोल ताणायचा म्हटलं तरी सगळे हा तुझा माझा न करता सगळ्यांना मदत करत पुढे चालणार . पथकात सगळ्यांशी परिवारासारख वाटत कधी आपण दुसरे कोण आहोत याची जाणीवच होत नाही. दादा कुर्ता फाटलाय काय करू '' तुझा ना नेहमी कुर्ता कसा जातो रे हळू वाजव जरा काळजी घे जरा म्हणजे ना ओरडून सुद्धा लगेच थांब मागवलाय कुर्ता तो घाल नवीन . मंग्या दादा भूक लागली रे ये वडापाव मागवा रे हे घे पैशे उपाशी नका राहू इतकी आपुलकी. एकदम सगळ्यांना सावरुन सांभाळून नेणार. स्त्रीयांची इज्जत ठेऊन, महाराष्ट्राची संस्कृती जपत लहाना मोठ्यांना सांभाळून घेईन पुढे चाललो आहोत आम्ही. त्यालामुळे वादकाची मस्करी न करता त्याला समजून घ्या त्याचा सन्मान करा हिच इच्छा. धन्यवाद. एक वादक .....
-
कामावरुन घरी न जाता डायरेक्ट तालमीला किंवा वादनाला येतो तो वादक. आगमन सोहळा जवळ आलाय वादन एकदम सुरळीत पार पडल पहिजे ह्या विचाराने ज्याला रात्रीची ज़ोप येत नाही तो वादक.मोठ मोठी ढोल बांधून वादनात तलीन होतो तो वादक हातांच्या बोटांचा विचार न करता ताशा ची तर्री तर्री देतो तो वादक. मानाचा ध्वाज नाचवताना समोरच्या माणसाच्या आंगवार काटा आणायला मजबूर करतो तो वादक आणि ज्याच्या परफ़ेक्ट टोल मुळे अख्खं वादन बरोबर होत तो वादक. मेहनत आणि परंपरेवर ज्याच मनापासून प्रेम असत ना तो खरा वादक. वादकाला एक शाबासकीची थाप पुरे असते. त्याला पैसे महत्त्वाचे नसतात, त्याच वादन छान झाल की त्याला जगातलं दुसरं कुठलं ही आनंद फिक पडेल.
-
देव येतोय आपला , 😍 वादकांनो आहात ना तयार बाप्पाच्या ❤️ आगमनासाठी...🙏🏻
-