Shubham manjarekar   (Shubh)
0 Followers · 3 Following

Joined 16 March 2022


Joined 16 March 2022
24 JUN 2022 AT 1:26

माझी विठू माऊली
उभ्या जगाची साऊली

माझा विठू राया
त्याची जगावरी माया

माझा पांडुरंग
आहे सदैव आपल्या संग

माझी पंढरीची वारी
आहे जगात न्यारी

येता आषाढी कार्तिकी
आस लागे पंढरीची
जय हरी विठ्ठल

-


20 MAY 2022 AT 22:49

हमे शरीर की भुख नहि जनाब
इस लिये
हमारा प्यार झुठा और गद्दार लगता था....
अभी फिकर मत करो
सब मिलेगा पर मै .
.
.
.
नहि....

-


20 MAY 2022 AT 22:23

आयुष्याच्या रस्त्यावर सुखाची वाट‌ आहे
माझ्या कुंडी गावचा आमच्या ह्रुदयात अनोखा थाठ आहे
गावात जाताना नागमोडी वाट आहे
माझ्या कुंडी गावचा आमच्या ह्रुदयात अनोखा थाठ आहे
Fridge च्या जमान्यात गावात अजुन माठ आहे
माझ्या कुंडी गावचा आमच्या ह्रुदयात अनोखा थाठ आहे
माणसा माणसात अजुन माणुसकीची गाठ आहे
आणि म्हणूनच गर्वाने बोलतो .....
माझ्या कुंडी गावचा आमच्या ह्रुदयात अनोखा थाठ आहे . ❤️

-


18 APR 2022 AT 10:14

गगन दादा मंगेश दादा गोपाळ ताशावर आपली कमाल दाखवतात. मी, मनीष, निलू दादा, मनीष दादा, शुभम पत्रकार , अक्षय दादा, आकाश आवाज काढायला .मुलींच्यात सोना ताई अख्खा वाघ आहे कोणालाच ऐकणार नाही ढोल बांधला की तेवढंच मुलींना सांभाळून घेऊन लक्ष देणारी. मागे संध्या दीदी मानसी दीदी सोबत आहेच तिच्या .बाकी सगळी मुलं मुली आपला मौलाचा वाटा चालवत पुढे येत आहेत. ढोल ताणायचा म्हटलं तरी सगळे हा तुझा माझा न करता सगळ्यांना मदत करत पुढे चालणार . पथकात सगळ्यांशी परिवारासारख वाटत कधी आपण दुसरे कोण आहोत याची जाणीवच होत नाही. दादा कुर्ता फाटलाय काय करू '' तुझा ना नेहमी कुर्ता कसा जातो रे हळू वाजव जरा काळजी घे जरा म्हणजे ना ओरडून सुद्धा लगेच थांब मागवलाय कुर्ता तो घाल नवीन . मंग्या दादा भूक लागली रे ये वडापाव मागवा रे हे घे पैशे उपाशी नका राहू इतकी आपुलकी. एकदम सगळ्यांना सावरुन सांभाळून नेणार. स्त्रीयांची इज्जत ठेऊन, महाराष्ट्राची संस्कृती जपत लहाना मोठ्यांना सांभाळून घेईन पुढे चाललो आहोत आम्ही. त्यालामुळे वादकाची मस्करी न करता त्याला समजून घ्या त्याचा सन्मान करा हिच इच्छा. धन्यवाद. एक वादक .....

-


18 APR 2022 AT 10:13

कामावरुन घरी न जाता डायरेक्ट तालमीला किंवा वादनाला येतो तो वादक. आगमन सोहळा जवळ आलाय वादन एकदम सुरळीत पार पडल पहिजे ह्या विचाराने ज्याला रात्रीची ज़ोप येत नाही तो वादक.मोठ मोठी ढोल बांधून वादनात तलीन होतो तो वादक हातांच्या बोटांचा विचार न करता ताशा ची तर्री तर्री देतो तो वादक. मानाचा ध्वाज नाचवताना समोरच्या माणसाच्या आंगवार काटा आणायला मजबूर करतो तो वादक आणि ज्याच्या परफ़ेक्ट टोल मुळे अख्खं वादन बरोबर होत तो वादक. मेहनत आणि परंपरेवर ज्याच मनापासून प्रेम असत ना तो खरा वादक. वादकाला एक शाबासकीची थाप पुरे असते. त्याला पैसे महत्त्वाचे नसतात, त्याच वादन छान झाल की त्याला जगातलं दुसरं कुठलं ही आनंद फिकुत्र . रुद्रा ढोल ताशा पथक म्हटलं कि विषय संपला .मराठी संस्कृती जोपासत ढोल ताशा पथकची आपली जुनी परंपरा जोपासत चालेल आमचं पथक. आमच्या पथकाचा पथक प्रमुख विकी दादाचा आवाज आला म्हणजे सगळे सावध होणार सगळ्यांच लक्ष मग त्याच्याकडे असणार. इकडे भाविक दादा ने आवाज केला मागे वळून कि समजून जायचं ठोका चुकलाय कोणचा तरी पुढे बघ मागे बघितलस ना तर टिपरु फेकून मारेल .सौमिल दादाकडे लक्ष द्यायचं म्हणजे ठोका चुकत नाही .

-


18 APR 2022 AT 10:05

कामावरुन घरी न जाता डायरेक्ट तालमीला किंवा वादनाला येतो तो वादक. आगमन सोहळा जवळ आलाय वादन एकदम सुरळीत पार पडल पहिजे ह्या विचाराने ज्याला रात्रीची ज़ोप येत नाही तो वादक.मोठ मोठी ढोल बांधून वादनात तलीन होतो तो वादक हातांच्या बोटांचा विचार न करता ताशा ची तर्री तर्री देतो तो वादक. मानाचा ध्वाज नाचवताना समोरच्या माणसाच्या आंगवार काटा आणायला मजबूर करतो तो वादक आणि ज्याच्या परफ़ेक्ट टोल मुळे अख्खं वादन बरोबर होत तो वादक. मेहनत आणि परंपरेवर ज्याच मनापासून प्रेम असत ना तो खरा वादक. वादकाला एक शाबासकीची थाप पुरे असते. त्याला पैसे महत्त्वाचे नसतात, त्याच वादन छान झाल की त्याला जगातलं दुसरं कुठलं ही आनंद फिक पडेल.

-


18 APR 2022 AT 10:00

एक वादक....
वादक म्हणजे नक्की कोण? वादक म्हणजे नक्की कोण असतो? त्याला काय मिळत वादन करून ? त्याला असं रस्त्यावर ढोल वाजवायला लाज नाही वाटत का? त्याला घरदार नाही का? आणि असे किती पैसे मिळतात वादन करून? कशाला नको त्या गोष्टी करायच्या. हे अशी खुप सारे प्रश्न पडत असतील ना तुम्हाला, नेमकं वदकाला वादन करून काय मिळत. उत्तर आहे माझ्याकडे. तुम्हाला जे थिल्लर चाळे वाटत ना अम्हाला ते आमची परंपरा वाटते. कमरेला जेव्हा ढोल किंवा ताशा असतो, हातात मानाचे ध्वज असतो, टोल च्या गाडीवरून टोल वाजवण्यात जो आनंद मिळतो ना ते तुम्हाला स्वतः अनुभवल्या शिवाय नाही कळणार. आमचा बाप्पा येणार म्हणून त्याच्या आगमनासाठी केलेली दोन महिने आधीची तालीम, बाप्पाच्या आगमनाला वाजवण्याचा सुख या पेक्षा जगात भारी काही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना ढोल-ताशा पथका द्वारे दिलेली मानवंदना ह्याचा आनंद तुम्हाला नाही कळणार ओ. मुल रिकामटेकडी आहेत म्हणून बोलणारी लोक आणि मुलींनी काय रस्त्यावर ढोल वाजवायची अशी बोलणारी लोक कधी काळा सोबत पुढे जाऊ शकणार नाही. काय वाटत तुम्हाला वादक बन सोप असत? ......

-


31 MAR 2022 AT 20:00

हमे भी याद आती है उनकी
पर दूर रहते है क्यूंकी हमे परवा है उनकी|
सोचू तो रोज मिल सकता हूँ
पर उसे भी परिवार है उन्हे भी परवा है उनकी |
प्यार तो खुदसे भी ज्यादा करता हूँ
पर बडा उसके परिवारने ही किया है क्यूंकी उन्हे भी
परवा है उनकी ......
प्यार करो जिम्मेदारीसे जबरदस्तीसे नहीं

-


30 MAR 2022 AT 23:29

जरुरत हे हमे उनकी क्यूंकि उनके वजहसे
हमारा दिन बनता हे...

-


20 MAR 2022 AT 10:28

चिऊ ताई चिऊ ताई परत ये ना ग
आणि आमच्या गोष्टीत रंग ना ग
आम्हाला आवडायच्या तुझ्या गोष्टी खूप
आता तर हरवल आहे साखर आणि तूप
आई आता बसते मोबाईल हातात ठेऊन
आताच्या बाळाची चिऊताई गेलं कोण तरी घेऊन
हताचा घास आता चमचाचा झाला
आई मोबाईलच्या समोर म्हणते झुकेगा नाही साला
शी झाली की काढत होती आमची आई
आता तर ह्गिज आलं शी काढायची गरजच नाही
चिऊ ताई चिऊ ताई परत येणा ग
आमच्या आईसारख्या आईला परत आण ना ग.....


-


Fetching Shubham manjarekar Quotes