कशी सुचते कोण जाणे ?🤔
माहीत नाही कुठून येते
काळजात सहज जाऊन बसते
बोलत असते सतत मला
लिहायचं नाही का ग तुला...
व्यस्त असतानाही सहज
भाव मनी चमकुन जातो
एकाच शब्दाने मग माझा
कागद पूर्ण भरून वाहतो....
कशी सुचते कोण जाणे
कल्पनेला पंखच फुटतात
आसुसलेले हात मग लिहिण्यासाठी
झटपटत अधीरच असतात......
कविता माझी सहज फुलते
मन हिंदोळ्यावर अलगत झुलते
शब्दांना मग फुटता धूमारे
कल्पनेचे फुलती काव्यपिसारे.....
28.03.2020..✍️✍️
सौ.कल्पना रमेश हलगे वानरे
-
आपण भ्रमात असतो
त्याला काही माहीत नाही
पण कदाचित
तो सर्व जाणून शांतही असू शकतो
-
कुठेतरी दूर... आकाशाच्या टोकाशी
लुकलुकत असते एक चांदणी
तिच्यात ही जीव अडकतो...
बाकी काही नाही..
कुठेतरी दूर लांबवर..
चमकत असतो एक तारा...
त्याच्या साठी जीव झुरतो..
तारे कधीच ओंजळीत येत नाहीत...
हे माहीत असूनही...
मुठीत धरावेसे वाटतात..
बाकी काही नाही...
पावसाचा एक अनामिक थेंब
होऊन जातो आपलासा...
का होतो तो आपला...
माहीत नाही...
-
कधी कधी असं का वाटतं
माहित नाही...
कधी कधी एकटं एकटं का वाटतं
माहित नाही...
सगळंच अवघड होऊन बसतं
का... ते माहित नाही...
हसावस वाटत नाही
रडू रडू होत
का... माहित नाही...
खूप गंभीर आजार असतो हा
माहित नाही...
काही प्रश्नच असे असतात
उत्तर एकच असतं
माहित नाही...
नक्की काय असतं हे
माहित नाही...
मी शोधतेय...पण
उत्तर...माहित नाही...
— % &-
माहीत नाही का?
माहीत नाही का पण,
तुझी आज मला खुप आठवण येतेय,
पुर्ण दिवस-रात्र तुझा सोबत रहावसं वाटतय,
तुला हसायला आलं की तुझा सोबत हसावसं वाटतय,
आणि तुला रडायला आलं ना की तुझ्या सोबत रडावसं वाटतयं,
तुला हव्या असलेल्या माझा प्रत्येक साथाला तुझी साथ द्यावीशी वाटतेय,
आणि तु कितीही व्यस्त असलीस ना तरी थोडासा वेळ तुझा कडुन घ्यावासा वाटतोयं,
व माझं असलेल संपुर्ण आयुष्य आज तुझा सोबत घालवावसं वाटतयं,
माहीत नाही का पण,
तुझी आज मला खुप आठवण येतेय.....
Written by : rohanrj-
#माहीत नसलेली गोष्ट
सगळ्याला सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे
असे काही नसते
काही गोष्टी माहीत न झालेले बरे असतात.
-