फिरुनी जर का लाभला
जन्म मज नवा
मिळुदे कूस याच मातीची
हेच मागणे देवा-
गर्जा महाराष्ट्र माझा..!!
स्वराज्य निर्मितीचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या पराक्रमाने दिल्लीचे तख्त हादरवुन, हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या रणझुंजार पराक्रमाने पेटून उठणारा 'धगधगता' - महाराष्ट्र माझा..!
हिंदवी स्वराज्य रक्षिण्याकरिता, अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांचा 'लढवैय्या' - महाराष्ट्र माझा..!
स्त्री शिक्षणाचा विचार जनमाणसात रोवताना होणारा संघर्ष सहन करणाऱ्या सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंचा 'दिव्य' - महाराष्ट्र माझा..!
संपूर्ण जगाला जगण्याची कला शिकवणाऱ्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'पवित्र' - महाराष्ट्र माझा..!
देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वात मोलाचं योगदान देणारा
'खंबीर' - महाराष्ट्र माझा..!
आपल्या भारताला गायन, कला, क्रीडा, शिक्षण, कृषी, साहित्य, राजकारण, समाजकारण, माहिती तंत्रज्ञान, संत साहित्य, आरोग्य व अशा इतरही सर्व क्षेत्रातील रत्न बहाल करणारा 'सर्वगुणसंपन्न' - महाराष्ट्र माझा..!
महाराष्ट्र दिन चिरायू होवो...!-
‘इये मराठीचिये नगरी । ब्रह्मविद्येचा सुकाळु करी । देणे-घेणे सुखचि वरी। होऊ देई या जगात।।’
अर्थ - ‘मराठी भाषेच्या या नगरात ब्रह्मविद्येचं इतकं वैपुल्य असू दे की ती देण्याचा आणि घेण्याचा असे दोन्ही व्यवहार सुखरूप होऊ दे,’
#महाराष्ट्र_दिन
#ज्ञानेश्वरी 🙏🚩-
शेकडो हुतात्म्यांचा आहुतीने निर्मिले महाराष्ट्र
शिवशंभू चा लौकिकाने सजलेले मराठी राष्ट्र
विठूचा आशीर्वादाने सुखाने नांदणारे मराठी राष्ट्र
श्वासात नवचैतन्य निर्मिनारे मराठी राष्ट्र
चित्ती न ठायी ठायी मराठी राष्ट्र
सह्याद्रीचा शिखराऐवढे साहस घेऊन जन्मलेल्या लेकरांचे मराठी राष्ट्र
अशा बुलंद व महापराक्रमी शर्थीच दिव्यनाम हे महाराष्ट्र
🚩🚩महाराष्ट्र दिनाचा हार्दिक शुभेच्छा 🚩🚩-