शब्दांनी लिहीले जिथे
तिथे माती मोल असतो हिरा ही
ना मोल कशाला उरते
उरते फक्त तिथे विश्वास अन मैत्री...
ना काळजी उद्याची अन आजची
सौख्य नांदते तुझ्या माझ्या सोबती
हेरगिरी किती ही झाली तरी
शेवटी राहते आठवणीत सदा ती नाती..
ना मोल ना जाण त्या शब्दाला
अथांग आहे म्हणून तर मैत्री
सुदामा होता तो एकच
जिथे जपली कृष्णा तुझी मैत्री पोह्यातुनी..
आसवांची दैना ती
पारख होती सदा पाठी
खरच होती साथ नेहमी
जशी सुर्य आणि चंद्राची महती..
#तृषार्त-
एक वचन असही ..
माझ आहे रे प्रेम तुझ्यावर फक्त
माझ्या सोबती नेहमी राहा
फक्त तुझी बनुन राहील मी
......हो पण कधी.?
तुझ्यावर आहे विश्वास माझा
तुझ्याशी प्रत्येक नातही
तुझ्यात जीव अन माझा अंत ही
.......हो पण कधी.?
ही सृष्टी संपेल
हा प्राण ही अर्पण होईल
तुला फक्त सुखात बघेल अन
त्यातच माझ सुखही असेल
........हो पण कधी.?
आहे ना जेवढा वेळ
तो सर्व तुझा असेल
तुझ्या वर सर्व कुर्बान
कारण तु आणि मी एकच नेहमी असेल
........हो पण कधी.?
#तृषार्त-
एक सत्य आहे अशे
जिथे सर्व क्षण थांबतात
बदलणारे नशीब असते जिथे
तिथे अनेक प्रसंग वावटळ ही उठवतात...
#तृषार्त-
हवेत विरल्या त्या आठवणी
समवेत होती आठवण तुझी ही
होता रे तो विश्वास खुप
जिथे भेदलीस बाणाने तु पाठ ही...
ऐकले जेव्हढे होते
सर्व तुझ्या सामोरे उघडे केले
काय सत्य काय असत्य रे
कर्म कोणते तु देवा देऊ केले..
तुझ्याविना खरच शून्य होतो
कारण तुझ्यात तर होता जीव ही
शब्द तुझ्याच साठी होता रे
अरे तुझा फक्त होतो मी ही..
खरच तु महान आहेस
शब्दांची लाज ही
आजही आहेस तु फक्त माझा देवा
कारण या अपुरया जिवाची आहेस
"श्वास" ही.....
#तृषार्त-
प्यासो रहो न दश्त में बारिश के मुंतज़िर
मारो ज़मीं पे पाँव कि पानी निकल पड़े
तृषार्ताने वनात पाहू नये केवळ वाट पावसाची
मारावी एखादी तरी लाथ जमीनीवर काढण्या पाणी
मूळ उर्दू शेर: इक़बाल साजिद
मराठी अनुवाद: प्रमोद (पीडी) देशपांडे-
तू हिरवाईने नटलेला गालिचा
मखमली पायघड्या घालत
दिमाखात
सजलेली धरा.....
मी निष्पर्ण तरु...
तुझ्यासवे उभा एकला...
काट्यांतूनही दिसलेला..
तृषार्त तुझ्या असण्याने..
जाणिवा अनुभवत मी...
उभाच ठाकलेला....
- के.ज्योती
-