‘Honesty is the best policy.’ हे सुप्रसिद्ध वचन ‘सुविचार’ नक्कीच नाही असे माझे मत आहे. धोरण हे विचार करून ठरविलेले असते. प्रामाणिकपणा हा धोरणी मुत्सद्दीपणातून येणे नक्कीच श्रेयस्कर नाही. सचोटी ही सहज स्वभावासारखी स्वाभाविक जीवन पद्धती असली पाहिजे.-
मिर्ज़ा ग़ालिब
आशिक़ी सब्र-तलब और तमन्ना बेताब
दिल का क्या रंग करूँ ख़ून-ए-जिगर होते तक
शहाणी माझी प्रीत पाहते वाट;
परी इच्छा धावती अविश्रांत
नाही थांबत जोवर दुखणे;
होईल कसे हृदय विश्रांत
मराठी अनुवाद: प्रमोद (पीडी) देशपांडे
(ख़ुशबू का सफ़र)-
बच्चों के छोटे हाथों को चाँद सितारे छूने दो
चार किताबें पढ़ कर ये भी हम जैसे हो जाएँगे
कोमल करांनी द्यावे स्पर्शू, मुलांना चंद्र चांदण्याही
वाचून पुस्तके चार, आपल्यासारखी होतील तीही
निदा फ़ाज़ली-
दि. २६ जानेवारी
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है
धगधगते ज्योत क्रांतीची हृदयात
बघू जोर कितीये अधमाच्या बाहूत
मूळ उर्दू शेर: बिस्मिल अज़ीमाबादी
मराठी अनुवाद: प्रमोद (पीडी) देशपांडे-
आप की याद आती रही रात भर
चश्म-ए-नम मुस्कुराती रही रात भर
स्मरण प्रियेचे होतच राहिले रात्रभर
नेत्रातले पाणी हसत राहिले रात्रभर
मख़दूम मुहिउद्दीन-
तुम्हारे पावँ के नीचे कोई ज़मीन नहीं
कमाल ये है कि फिर भी तुम्हें यक़ीन नहीं
आधाराला पायाखाली तुझ्या नाही थोडी जमीनही
कमाल ही की तुला याची नाही साधी आशंकाही
दुष्यंत कुमार-
ख़ुद अपनी मस्ती है जिस ने मचाई है हलचल
नशा शराब में होता तो नाचती बोतल
मस्ती आम्हा अंगचीच, खळबळ तिजमुळे माजली
असती मदिरेत नशा, नाचली नसती का बाटली !
मूळ उर्दू शेर: आरिफ़ जलाली
मराठी अनुवाद: प्रमोद (पीडी) देशपांडे-
अंगड़ाई भी वो लेने न पाए उठा के हाथ
देखा जो मुझ को छोड़ दिए मुस्कुरा के हाथ
देता न ये आळोखेपिळोखेही तिला उंचावून हात
पाहुन मला लाजुन हसत घेतले खाली तिने हात
मूळ उर्दू शेर: निज़ाम रामपुरी
मराठी अनुवाद: प्रमोद (पीडी) देशपांडे-
बहुत पहले से उन क़दमों की आहट जान लेते हैं
तुझे ऐ ज़िंदगी हम दूर से पहचान लेते हैं
तुझ्या आधी मना तुझी चाहूल येते
प्राणप्रिये तुझी खूण दुरूनी पटते
मूळ उर्दू शेर: फ़िराक़ गोरखपुरी
मराठी अनुवाद: प्रमोद (पीडी) देशपांडे-
वो आए घर में हमारे ख़ुदा की क़ुदरत है
कभी हम उन को कभी अपने घर को देखते हैं
झाली कृपा ईश्वराची..अवतरली घरी ती साक्षात
पाहतच राहिलो आम्ही- कधी तिला.. कधी घरास
मूळ उर्दू शेर: मिर्ज़ा ग़ालिब
मराठी अनुवाद: प्रमोद (पीडी) देशपांडे-