QUOTES ON #कधी

#कधी quotes

Trending | Latest
19 MAR 2019 AT 11:39

कधी मोकळे शब्द निघावे,
स्वरांसही जणु पंख फुटावे,
धुंद रेशमी मखमल जशी ही,
मुक्त स्वैर मी नभही व्हावे.

कधी मोकळे सुर जुळावे,
ताल तयासी जोडत जावे,
बघता बघता अन् अचानक,
सुरेल ऐसे गाणे व्हावे.

कधी मोकळे गीत सुचावे,
तान मनाशीच आळवत जावे,
नकळत कधी मीच मला हो,
कळता कळता उमजत जावे.

-


19 MAR 2019 AT 11:29

उत्तुंग भरलेल्या तुझ्या मनाला
कधी मोकळे व्हावे वाटले
तर माझ मन खाली आहे
कधी मोकळे रडावे वाटले
तर माझा खांदा रिकामा आहे
कधी मोकळे हसावे वाटले
तर माझे डोळे आतुरतेने वाट पाहत आहेत

-


19 MAR 2019 AT 11:10

कधी कधी खूप वाटतं की तुझ्याजवळ मनमोकळेपणाने बोलावे, कधी तुझ्यापाशी व्यक्त व्हावे, पण या मनाला काही मर्यादा आहेत, आणि त्या मर्यादांमुळे मी नाही कधी मोकळेपणाने तुला काही सांगू शकत.....

-


23 MAR 2019 AT 11:34

-


27 MAR 2019 AT 13:56

-


27 MAR 2019 AT 16:55

-


27 MAR 2019 AT 11:53

-


14 APR 2019 AT 12:41

कस सांभाळतो मी स्वतःला,
सांगावस वाटत ग कधी तरी तुला.
दुखः सांगुन माझ, तुझ्या मनात ही,
दुखःच बिज नाही पेरायचय ग मला.

-


10 SEP 2020 AT 17:44

रोज येतेस माझ्या स्वप्नात
न बोलताच निघून जाते
कधी तरी असे घडावे
मनात ठेवलेल्या भावना
तु शब्दात उतरावे
कधी तरी असे घडावे
माझ्या स्वप्नांतूनी तु
सत्यात अवतरावे
कधी तरी असे घडावे

-


20 MAR 2019 AT 17:52

-