नियती आपल्याला इतकी हतबल करते कि, काळाबरोबर आपला आत्मविश्वास, स्वाभिमान, आपलं ' स्वत्व ' च आपल्यापासून हिरावून घेते....
त्यामुळे आपली अवस्था ही भित्र्या सश्यापप्रमाणे होते, पाठीवर पडलेलं छोटसं पानही आभाळ कोसळल्यासमान वाटू लागतं..!!-
आपल्या आजूबाजूला जे घडत आहे ते चुकीचे आहे, हे कुठेतरी जाणवत असतं.. पण परिणामांच्या भीतीपोटी त्याला विरोध करणं नेहमी टाळत राहतो,
म्हणजे गप्प राहून एकप्रकारे आपण त्या गोष्टीचे समर्थनच करत असतो नाही का.....?-
प्रवास, प्रयत्न करून थकले मन आता.... कितीही प्रवास केला, प्रयत्न केला तरी शेवटी मन कोणत्याच ' निष्कर्षापर्यंत ' पोहचतच नाही......
-
समजूतदारपणा....
कसे असते ना !!
सगळ्यांनाच असे वाटते की त्याला कोणीतरी समजून घेणारं असावं ; मग काय, ना आपण कोणाला समजून घेतो, ना कोणी आपल्याला....
पण समजूतदारपणाची भाषा मात्र प्रत्येकजण करत असतो....!!-
परिस्थिती आणि मनःस्थिती
शेवटी सर्व काही परिस्थिती आणि माणसाची त्यावेळची मनस्थिती यावर त्याचे वागणे, बोलणे अवलंबून असते!
माणूस नेमक्या कोणत्या मनःस्थितीतून / परिस्थितीतून प्रवास करत असतो याची कल्पना कोणालाच नसते ; त्यामुळेच त्याच्या अचानक बदललेल्या वागण्याचा, बोलण्याचा आपल्याला काहीच अंदाज नाही बांधता येत.....
आणि अशावेळी त्या व्यक्तीला फक्त आपल्याला समजून घेणाऱ्याची गरज असते....-
एक साधा प्रश्न होता माझा,
ज्याचे उत्तर आजही तुला देता येत नाही,
कसे रे असे तुझे प्रेम, जे अजूनही मला जाणवत नाही,
प्रेम आहे असे म्हणणं आणि ते जाणवणं,
यातला फरक तुला कधी कळलाच नाही रे...
प्रेम मनापासून मनावर केलं जातं,
मनात उमटणार्या त्या भावना,
या तुला कधी समजून घेताच आल्या नाहीत..
खूप साधा प्रश्न होता माझा,
ज्याचे उत्तर आजही तुला देता आले नाही.......-
जसे समुद्र जवळ असूनदेखील ' किनारा ' पाण्यावाचून अतृप्त असतो,
आयुष्याचेही असेच असते,
काही गोष्टी आपल्यासोबत असतात...
पण तरीही आपल्याला त्यांचा ' सहवास '
अनुभवता नाही येत !!-
जिन्होंने आज भी अपने अंदर के बचपने को जिंदा रखा हैं।
और जो अपना पागलपन आज भी बड़े मजे से जीते हैं,
उन सभी को बालदिवस की ढेर सारी शुभकामनाएं।। 🎈🍫🤗-
आवडतं मला, माझ्या एकांतात रमायला,
त्यावेळी स्वतःला समजून घ्यायला, समजवायला,
स्वतःला सावरायला, कुणावरही अवलंबून न रहायला,
' आपला एकांत जगताना कोणाला गमावण्याची भीती नाही -
आणि कोणाच्याही अपेक्षांचे ओझे पण नाही..
ही खोटी अल्पावधीची भावना बाळगायला !! '
मनात झालेला विचारांचा पसारा आवरायला,
नानाविध प्रश्नांच्या वादळाला सामोरे जाऊन,
उत्तरांचे क्षितिज पार करून तो आनंद साजरा करायला,
आकाशात स्वच्छंदी भरारी घेण्याची स्वप्नं बघायला...
आपल्या कल्पनावादी भाबड्या - वेड्या विचारांत हरवून जाणं,
खुपदा असेही जगायला आवडतं मला......-
कधी कधी चंद्राला न्याहाळण्यात एक वेगळीच मजा असते, त्याच्याशी गप्पा मारणं, त्याला नुसतं बघितले तरी सगळा क्षीण निघून जातो; खुपदा आपल्या एकटेपणाचा तोच तर साथीदार असतो.... चंद्राला बघितल्याबरोबरच मनात अनेक सूर छेडले जातात आणि नकळत मन गुणगुणत त्याच्यात हरवून जाते.....🎶 किती वेडं असतं ना आपलं मन.... 🙂
-