QUOTES ON #ओव्या

#ओव्या quotes

Trending | Latest
24 JAN 2019 AT 1:30

माफी देणं त्याची साथ ही आशा, व्यापारी जाणे बेरजेचे ते गणित,
निश्चयाने त्याग केला अहं चा, झोपेच्या सोंगाड्यास आला का माफीचा आवाज ?
उत्तर ते येईल आशा मज लागली, त्या ओढीची प्रीती पामर काय जाणे ?
गर्विष्ठ परिसास नाही लोहाची संगत, आता सोनं देवा कसे रे होईल ?

-


18 JUL 2020 AT 17:25


सुटावीत कोडी , वाढू लागो गोडी
जिवा सवंगडी , भेटताच ।
आठवांच्या रानी,शब्दांनी हिंडावे
अश्रूंनी वाहावे ,लोचनात ।
मैत्री हाच धर्म , काळ ,वेळ ,कर्म
सारथ्याचे मर्म , मैत्रियात ।
मिळावा सांगाती , कराया उन्नती
आनंद भरती ,विचारांत ।
ऐसा माझा सखा , असो निष्ठावंत
माझा भगवंत ,देव्हाऱ्यात ।

-


6 JUL 2018 AT 7:33

आधुनिक बहिणाबाई ओव्या

अरे संसार संसार जशी पोळी यंत्रावर
आधी प्रेस व्हावे लागे तेव्हा बनते भाकर

अरे संसार संसार ,गरम जेवण ओव्हनवर,
सेट ओव्हन 3 मिनिटे ,गरम जेवण ताटावर

अरे संसार संसार , नको वाटण घाटण,
विद्युत चक्की तो मिक्सर , येई धावून लगोलग

अरे संसार संसार , झाडलोट नक्को बाई
चुटकीत होई साफ ,फिरवता व्हॅक्युम क्लीनर

अरे संसार संसार , धोबीघाट कित्ती त्रास
हाताशी वॉशिंग मशीन , धुणे करी सुसह्य

अरे संसार संसार , नाही वेळ घालवण्या साधन
टीव्ही वायफाय मोबाईल , स्मार्ट असे न्यू वुमन

-