खरी चूक तीच असते ज्यातून आपण काहीच शिकत नाही
-
एकदा तुम्ही तुमच्या स्वतःतील दोषांचा स्वीकार केला की, कोणीही त्यांचा तुमच्याविरुद्ध वापर करू शकत नाही.
-
माणसाने भूतकाळात बघायचं,
भविष्यात डोकवायचं की
वर्तमानात जगायचं
यावरच आपले सुख दुःख
अवलंबून असते.-
तुम्ही स्वतःच ही तुमची सर्वात मौल्यवान मालमत्ता आहात. त्यामुळे आजच यामध्ये गुंतवणूक करणे सुरू करा.
-
माणसाकडे फक्त चूक मान्य करण्याचे धैर्य आणि चुकांतून शिकून सुधारणा करण्याचा विचार असेल तरी माणूस खुप काही मिळवू शकतो.
-
प्रत्येकाला कोणाचे तरी आयुष्य उजळून टाकण्यासाठी सूर्य व्हावे असे वाटते, पण चंद्र का नसावा?
कारण चंद्रही कोणाच्या तरी काळोखात चमकू शकतो,प्रकाश दाखवू शकतो.-
यश व अपयश आपण विरुद्धार्थी शब्द मानतो,परंतु बारकाईने बघितले तर अपयशदेखील यशाचा एक भाग आहे.
-
तुमच्या समस्या सर्वानाच सांगत बसू नका,
कारण ८० टक्के लोकांना त्याबद्दल काही घेणेदेणे नसते आणि २० टक्के लोकांना तुम्हाला समस्या आल्यात यातच आनंद मिळत असतो.-
"कष्ट करणे खूप महत्वाचे आहे परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे."
-
चप्पल व माणूस यामधील समानता..
जर दोघांकडूनही इजा होतेय म्हणजे ते तुमच्या मापाचे नाहीत हे स्पष्ट आहे.-