आगार वाटन सागर वाट
सागर वाटन आगर वाट
आगरी आनी कोली लोकांची
कवी, लेखक, कलाकारांची
समिन्दराच्या किनारची वाट
मीठ-माशांचे सहवासात
भूमी पुत्रांचे हक्का सोबत
क्रांतिकारांची नवीन वाट
खारट, तुरट, तिखट भारी
तरी तिची हाय न्यारीच गोरी
जगान तिचा येगला थाट
एकविरा आईच्या आशीर्वादान
खंडोबा देवाचे आशीर्वादान
सुखानं धावू दे थाटामाटात-
Lockdown वारोला
पण लोखांचे अले जिवाव....
पावसाळा आसता त
मास तरी भेटलस्त चिवाव....-
परतेक गोष्टीवल्या राजकारण कराची
सवय ह ये नेत्याना....
एक आन्डा घालून गाव भ गोंगाट भराची
सवयच ह कोखेऱ्याना....-
पोरीच्या रं बापा
तुला कसली चिंता हाय ,
आरं लक्ष्मी चे रूपानं
तुझी पोरगी पाठीशी हाय.
शिकली सवरलेली पोर तुझी
तुला अभिमान का वाटत नाय ,
पोऱ्या तुझा वाईट संगतीन परून
आयुष्य बरबाद कराला लागलाय.
आरं तिचेमुलच हाय
तुझे घराला घरपण,
जवा सासरी जाईल ती
तवा विचारान परशिल तू पण.-
कविता करणारा प्रत्येक व्यक्ती
प्रेमानं नसते....
प्रेम करू शकत नाय
म्हणून तो लिवित आसते....-
वारी पंढरीची
ओढ विठुरायाच्या भेटीची....
तहान , भूक विसरून गेलो
आस लागली मनाला विठ्ठल दर्शनाची....-
मटण-मच्छी भेट नाय
ना सुक्की मच्छी पण खपली...
१००० रु किलो जरी मटण इकला ना
तरी लोखा झेवून येतील टोपली...-
कनच्या र या जाती
ना कनच ये धर्म....
देवाचे सामनी सगली सारखीच आसतान
देवाला आवारतान फक्त चंगल कर्म....-
आयुश्यान संकट
लाख येतील....
तेच संकटांव मात कर
तिच संकट तुला अनुभव म्हणून कामी येतील....-