शृंखलेत गुंफून कविता
फुलांत सजलेल्या माळ होतात,
हसवतात कविता क्षणांत
तर क्षणांत अश्रूंना वाट देतात.
मिळून जातात शब्द शब्दांना
मग यमकही जुळून येतात,
भावनांना कवटाळून कविता
कैफियत सांगून मोकळ्या होतात.-
मनातलं शब्दांमध्ये मांडतो.😍
------------------... read more
कसा आहेस ? तू मला दररोज पाहतो आणि हल्ली तर तुझ्यासमोर येऊन गप्पा मारतो,केसांचा तुरा उडवतो, एका अर्थी वेड्यासारखा करतोय मी !आतल्याआत हसत असशील ना मला पाहून ?
मी जो आहे त्याचे अनुकरण तू जसं च्या तसं करतोस. त्यात खोटी स्तुतीही नसते.फक्त खरेपणा असतो.इतका कसा रे खरा आणि स्वच्छंदी तू?
तुला माहित आहे की तू ठिसूळ आहेस.एकदा जरी तू पडलास की तुझे तुकडे होतात.पण तरीही तू तुझा खरेपणा सोडत नाहीस.मात्र माणसाचं असं अजिबात नसतं.त्यांच्या मध्ये एक 'मन’ नावाचा आरसा असतो.तो ही तुझ्यासारखा ठिसूळ असतो मात्र एकदा तुटला की खरेपणा सुद्धा तुटला जातो.
तू कधीही खोटं बोलत नाहीस पण तरीही एक प्रश्न मनात येतो,सलून मध्ये केस कापायला गेलो की मी जरा वेगळा दिसतो,त्या आरश्या मध्ये पाहिलं की स्वतःवर अजुन जास्त प्रेम वाढतं.त्या आरश्यात काय वेगळेपणा असतो ????
तुला पाहत राहणारा....😂-
लागे वाईट संगत
बुद्धी भ्रष्ट तुझी होई,
वळण चुकीचे जीवनाला
नकळत तूच देई.
जाण तुझ्या संस्कारांची
नको विसरू रे कधी,
किती कटू बोलो कुणी
निर्मळ वाणी असो संगती.
वय घडण्याचे तुझे
दिशा जगण्याला दे,
स्वप्न साकारण्यासाठी
झेप आभाळी तू घे .-
खूप दिवसांपासून काहीतरी सांगायचं -
वाईट तर नाही ना वाटणार तुला?
अस पिंजऱ्यामध्ये दरवेळी बंद नको करू रे मला
जीव गुदमरून जातोय माझा या पिंजऱ्यामध्ये
मुक्तपणे उडून मोकळं श्वास घ्यायचंय मला.-
हर पहलू को सीखा देती हो
जिंदगी मुझसे इनायत कैसी ?
मगन रहता हूं सफर में तुम्हारे
जिंदगी तुझसे शिकायत कैसी ?-
तिचे मुक्त आभाळ
मी पाखरू भिरभिरनारा,
फुलाच्या आडोश्यासवे
चोरून तिला पाहणारा.
तिचा अंधार पहाटेचा
मी अंधारात विहारणारा,
मनमुराद गाण्याने
आभाळास मोहविनारा.-
मन छिन्न
विखुरतात आशा,
किती विभिन्न
व्याख्या निराशेच्या.
सोडवाया पाहतो
हाती उरतं काय?
गुंता आयुष्याचा,
खचलेले मन.
बाकी?
खंत राहते
भासते उणीव,
एकाकी होतो
गुदमरतो जीव.-
सर्वप्रथम, तुझे मनापासून खूप खूप आभार की ह्या कोरोनाच्या परिस्थितीत आमची नेहमीच साथ देतोस. आम्हाला आजारापासून वाचवतोस.वाटलं नव्हतं की जीवनाचा तू इतका महत्वाचा भाग होशील.
तु निरनिराळ्या रंगात आणि प्रकारांत आढलून येतो.
माझ्या माहितीप्रमाणे,प्रत्येक मास्क चे वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत.पण, तो एन.95 वाला मास्क हल्ली खूपच प्रचलित
झालाय. अगदी हिरोसारखा ! त्याप्रमाणे त्याचे मूल्य सुद्धा
वाढले आहे.
कोरोना येण्याआधी डॉक्टर,नर्सेस आणि जे वैद्यकीय
क्षेत्रामध्ये असणारे लोक तुला घालायचे.काही काही बाईक स्वार सुती कापडाचे स्टायलिश मास्क लावायचे पण ते कमी वेळासाठी.आता जर आम्ही कुठे घराबाहेर पडलो की तुला
घरामध्ये पुन्हा येईपर्यंत काढतचं नाही.म्हणजे तू विचार करू
शकतो किती हे प्रेम आमचे !-
आश्रय घेतात ते पानांवर
साज मोत्यांचा जणू त्यांना,
टपोरे थेंब सामावून घेतात
सभोवतालच्या स्थानांना.
हलत राहतात, डुलत राहतात
पानांना थेंबाचे आकर्षण,
जलद अश्या वाऱ्यासवे
ते होतात मातीत विलीन.-
लहानपणी मला तू सर्व ठिकाणी दिसायचा.पण आता खरं सांगायचं झालं तर, क्वचितचं कुठे सापडतोस. तुझी जागा त्या छोट्याश्या मोबाईल ने हिरावून घेतली आहे आणि त्याला आम्ही जबाबदार आहोत.
तुला वाचण्यात जी मजा असायची ती त्या मोबाईल मध्ये अजिबातच नाही. शब्दांना झूम करून पहावं लागतं त्यात डोळ्यांनाही त्रास. मला आठवतंय,बाबा तुला वाचत असायचे, त्यावेळी मी तुझ्यामधून तोच पान शोधून ओढून घ्यायचो, ज्यामध्ये निरनिराळे चित्र असायचे. मग त्यांना रंगवायचो.
बाबांनी मला सूडोकु कसं पूर्ण करायचं हे शिकवलं.आता त्या मोबाईल ने सूडोकु ची जागा स्वतःमध्ये तयार केली.तुला वाईट वाटत असेल ना ! शब्दकोडे न चुकता सोडवायला खूप विचार करावा लागतो आणि खरोखर बाबा ते सोडवतात सुद्धा.त्यांना यातून बक्षीस म्हणून मिक्सर मिळाला होता.हे अजूनही मला आठवतंय.
ती तुझी कात्रणे,प्रोजेक्ट साठी तुझ्यामध्ये शोधलेले फोटो,काही थोर व्यक्तीची माहिती अजूनही माझ्या वही मध्ये जपून ठेवलेली आहेत.तुझ्यासोबत जोडल्या गेलेल्या खूप आठवणी आहेत ज्या मी कधीच विसरू शकत नाही.-