अनाथांच्या आई।
हो त्याच सिंधुताई।
आज डोळे ओलेचिंब होई।
सदैव आठवणीत राहतील माई।-
गोद के संतान को छोड, वो हजारो की माँ हो गई
ज़िन्दगी की आखरी कसौटीमे भी वो
धरती छोड सारे जहाँ का आस्माँ हो गई-
जीवन यात्रा 73 वर्ष
1500 बच्चों की मां
पुरस्कार मिले 700
शिक्षा केवल चौथी कक्षा
ये उपलब्धियां उनके वैवाहिक जीवन में एक कठोर घटना के बाद हुईं
उसने अपने दुखों को 1500 अनाथ बच्चों के दुखों को दूर करने के अपने दृढ़ संकल्प के रूप में बदल दिया।
एक शक्तिशाली महिला, दिव्य माँ, नैतिक कई लोगों के लिए एक बार के जीवन में लगातार किसी भी परिणाम का सामना करना पड़ता है
कई परित्यक्त बच्चों के लिए उन्होंने हमेशा अपने हाथ खुले रखे, शुद्ध आत्मा को विश्राम दिया !!
मेरे प्रणाम-
महाराष्ट्र की माई, सिंधूताई सपकाळ...
जिन्होने हजारो अनाथ बच्चो को गोद लिया और उनका खयाल रखा, उन बच्चो को education दिया, ऐसी माँ आज उन अनाथ बच्चो को फिरसे अनाथ बना कर इस दुनिया को अलविदा कह गई।
🙏💐भावपूर्ण श्रंद्धांजलि💐🙏-
त्या अनाथ मुलांच्या सोबतीने तो पावन
"अनाथ आश्रम" ही आज अनाथ झाला..
मायेचा झरा वाहत होता ओसंडून जिथून,
तो उगमस्थान आज कोरडा पाषाण झाला..
आसरा होता कणखर मनाच्या माऊलीचा
त्या असंख्य अनाथ बालकांसाठी, पण
नियतीच्या विळख्यात तो आसराच आज
निराधार झाला..
कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण
करून खूप दूर गेलीस तु माई, ममतारूपी
तुझ्या कल्पवृक्षाखाली अनाथ लेकरांच्या
चेहऱ्यावर जो आनंद खुलला होता. तो
तुझ्या प्रेमळ हाकेविना आज परत पोरका
झाला..
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐
● अनाथांची माई - सिंधुताई सपकाळ ●-
जगावं कसं हे तिने अनेकांना शिकवलं.
अनाथांची माई म्हणून सगळ्यांना सामावुन घेतलं.
जिवनात संघर्ष किती तरी तिने रात्र शमशानात काढल्या.
लेकिच्या पोटासाठी तिने अनेक लेकिना सामिवल्या.
लोकांनी खुप काही बोलत होते तिने कधी त्यांच्याकडे लक्ष दिली नाही.
एका पासून सुरुवात केली चांगले लोक जुळत गेली नंतर कधी मागे वळून पाहिलं नाही.
सेवा करता करता अनेक आश्रमे उभारली.
महाराष्ट्राची मान देशात उंचावली.
सिंधूताईची कधी अनेकांची माई झाली हे कधीच कळले नाही.
कित्येक लोक होउन जातील पण माईची जागा कुणीच घेऊ शकणार नाही.-
सुटतात सारे ऋणानुबंध मी पण रुजत असते
वाईट परिस्थीती खरा माणूस घडवत असते
झालेले विसरून ते परत न घडावे याचा अट्टाहास सुचते
तेव्हाच माझ्या माई रुपी दैवत जन्म घेते
सोडून गेले आई बाप ताई असो की बंधू
रक्ताच्या नात्यापेक्षा मोठी माझी सिंधू
अचंबित सारे नातीच झाली भोंदू
अनाथांची आई बनली माझी माई सिंधू-
*माय*
अनाथांना छत्र देणारी,
कायमची निघून गेली माय...
ती म्हणायची; "ज्यांना कोणी नाय, त्यांना मी हाय...!"
जळत्या प्रेतावर लेकरांसाठी,
भाजली होती तिने भाकरी...
तिला वागवत नव्हते हो,
कोणीही चांगले सासरी...
दिला थारा तिने ;
हजारो अनाथांना...!!
जवळ केलं तिनेच,
नको असलेल्या पोरांना...!
झाली पोरकी पुन्हा पोरं ,
हरवलं छत्र त्यांचं सारं....
अशा या थोर माईला,
माझे कोटी-कोटी नमन....
आशीर्वादीत झाले तिच्या,
जाण्याने ते गगन...!!
*सिंधुताई सपकाळ (माई) यांना सदैव विनम्र अभिवादन*
🖊️ *कल्याणी शशिकांत म्हंकाळे*-
यह भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद |
हम अपने पास आए दिल टूटने के बाद||
SindhuTai-
तिच्या जाण्याने सारी जिवं हळहळली,
सामावून घेताना तिला धरणीमाय सुद्धा भाळली,
अगं! तुझीच लेक ती, तुझ्यातच विलीन,
एकरूप व्हा दोघी एकमेकींत तल्लीन..!!
माय तुझ्या कष्टाला आता पूर्णविराम मिळाला,
विसावून त्या आभाळात तुझा चमकता तारा झाला,
देव परमात्म्याने सुद्धा आता सुटकेचा निःश्वास सोडला,
कारण त्याने नेलेल्या लेकरांना मायेचा पदर मिळाला..!!
इथल्या सर्वांनाच वाटते आता पोरकेपणाची खंत,
नाही रे लेकरांनो! तुमची माई तुमच्यातच आहे जिवंत,
शेवटी मृत्यू म्हणजेच नसतो अंत,
तिचं जगणं, शिकवणं, सांभाळणं हेच संस्कार अनंत..!!
-