माळावरचा पळस प्रिये मी, तू तुळस जशी अंगणी गं
मी तुटलेला तारा बहुधा, तू शुक्राची चांदणी गं
-
तृतीयपंथी व्हायच्या अगोदर... मी एक माणूस आहे
सांगा चूक की बरोबर......मी एक माणूस आहे
शारीरीक बदल असतील माझ्यात पण
मनात आहे भावनांचे सरोवर...मी एक माणूस आहे
किळसवाण्या झेलतो रोज लाखों नजरा
डोळ्यांत दाटतात अश्रृ खरोखर...मी एक माणूस आहे
ईश्वरनिर्मित आहे यात काही शंका आहे का
माझ्यासाठी ही आहे ही धरोहर....मी एक माणूस आहे
नूसत्या टाळ्या वाजवून मिळालेला पैसा नको
कष्टाने माझे ही आयुष्य होईल मनोहर...मी एक माणूस आहे
श्रीपद्मा
-
बाभळीवर का जीव जडवतो... तुझा गुलाबी बहर गं
प्रिये तू श्रावण सुखावणारा अन मी ग्रीष्माचा कहर गं
-
माझ्या कवितानों जरा श्वास घ्या
मनामनात रूजण्याचा जरा ध्यास घ्या
प्रेम,विरह याच्यांशी चांगलीच मैत्री तुमची
जरा वंचिताच्या दुःखावरही एखादा तास घ्या
किती श्रावण तुम्ही पाहीलेत आजवर
कधीतरी विषयासाठी रूक्ष वैशाख मास घ्या
तुम्हा पाहून अलगद यावे हास्य ओठी
हे नाहीच जमले तर तुम्ही अवश्य फास घ्या
किचकट अशा शब्दांनी रसिकांना गोंधळू नका
मनाला रूचेल अशी शब्दांची आरास घ्या
मला माहीत आहे जरा जास्तच हक्क गाजवतेय
पण माझ्यासाठी तुम्ही नक्कीच एवढा त्रास घ्या
जेंव्हा सजाल माझ्या शब्दांत तुम्ही
रसिकांनी प्रेमानी वाढलेल्या वाह वाहीचा घास घ्या
श्रीपद्मा
-
बरंच काही सांगायचं राहुन गेलंय
वादळात घर माझं वाहुन गेलंय
छोट्या मोठ्या संकटाची भीती ना उरली
प्रारब्ध माझी परीक्षा पाहुन गेलंय
नाहीच उरली आशा त्या प्रेमाची
मन माझे विरहगीत गाऊन गेलंय
जळणं त्याला आवडत असावं बहुतेक
दिव्यापाशी पतंगाला फडफडणं भावून गेलंय
किती अविरत झालंय त्याचं कोसळणं
धरतीचं मन चिंब चिंब न्हाऊन गेलंय
जात-पात,धर्माच्याही पलीकडे आता
ह्रदय पुन्हा पुन्हा प्रेमाकडे धावून गेलंय
त्याची स्पर्शभेट मी आता विसरू कशी
कसं सांगू आमच्यात काय होऊन गेलंय
श्रीपद्मा-
आज हमारे घर गणेश जी पधारे है
साथ मे उनके मुषक जी प्यारे है
आइए,बैठिए सिंहासन है तयार
स्वागत के लिए फुल भी न्यारे है
क्या थाटबाट से चलती है सवारी उनकी
देखने को उत्सूक चांद और सितारे है
देखिए गणेश जी एक नजर इधर भी
थाली मे सजे पकवान ढेर सारे है
हर कोई करना चाहे लाड प्यार आपको
हर एक के आप यहां तो दुलारे है
बडी आस रहती है आपके आने की
इंतजार मे आपके साल के दिन गुजारे है
श्रीपद्मा-
काल तू काळाचा । शिव तू शंभूचा ।।
पती पार्वतीचा । गौरीप्रिया ।।1।।
शिरी वाहे गंगा । जटेत शशी तो ।।
त्रीनेत्र शोभतो। महादेवा ।।2।।
हलाहल गळा । पचविले विष
सर्प तो विशेष । नीळकंठा ।।3।।
तांडव नर्तन । रूद्र तो करीतो ।।
दूष्टा संहारीतो । हरीहर ।।4 ।।
भोळा असे सांब । क्रोध तो कठिण ।।
भक्तापूढे लीन । चंद्रमौळी।।5।।
प्रसन्न होऊनी । द्यावा आशिर्वाद ।।
लागो तुझा नाद । पद्ममना ।।6।।
श्रीपद्मा-
डोळसपण दे देवा नूसते डोळे नको
मन स्वच्छ असू दे जरासे ही काळे नको
शहाणपण नको तेवढे बस जरासी जाण दे
दुस-या उपयोगी पडतील असल्या गुणांची खाण दे
नूसते हे ह्रदय नको,त्यात दया,माया ही दे
झिजेल जी लोकहितार्थ अशीच मज काया दे
नकोत नूसते कान परपीडा कानी पडू दे
ज्या जिव्हेतून वाचाळता येईल असली वाणी झडू दे
जाणता यावे दुःख दुस-याचे एवढी पात्रता दे
मदतीसाठी धावून जाता येईल असली मित्रता दे
नको नूसता देह,नकोत नूसते श्वास
परोपकाराचा त्याला लागू दे नित्य ध्यास
श्रीपद्मा-
या रंग बदलत्या दुनियेत जगायचं कसं
आपल्यांसोबत परक्यासारखं वागायचं कसं
चोर आणि डाकू, ही लूबाडणा-यांची वस्ती
प्रामाणिक पणा घेऊन इथं निभायचं कसं
कुठे उरली माणूसकी दोन पायाच्या जनावरात
माणसातला माणूस सांगा शोधायचं कसं
कितीही जीवन नकोसे वाटले तरी
हाती नसणा-या मृत्यूला मागायचं कसं
देशप्रेम,मातृप्रेम शोधूनही सापडेना
खाल्लेल्या मीठाला की हो जागायचं कसं
षडरिपूंचे विकार हावी होतात असे
कळत नाही त्यांना आता त्यागायचं कसं
दुस-यांचे दोष दाखवण्यात भारीच रस
आपल्या आत डोकावून बघायचं कसं
श्रीपद्मा
-