सुई की फितरत..
सिर्फ़ चुभने की थी साहब..
मिला साथ धागे का..
फितरत ही बदल गई..!!-
प्रेम म्हणजे प्रवास
प्रेम म्हणजे एकमेकात गुंतलेला श्वास
प्रेम म्हणजे एक अनोखा सहवास ll
प्रेम म्हणजे एकमेकांची साथ
प्रेम म्हणजे हाती घेतलेला हाथ
प्रेम म्हणजे संकटांवर मात ll
प्रेम म्हणजे मैत्री विश्वास
प्रेम म्हणजे जगण्याची आस ll
प्रेम म्हणजे सुखाची साद
प्रेम म्हणजे एक याद ll-
आयुष्यात ना "expensive gifts" देणारा कोणी मिळाला नाही तरी चालेल पण,
आपल्या वाईट वेळेत खंबीरपने आपली साथ देणारा "जोडीदार" मात्र मिळाला पाहिजे.
बरोबर ना .....😊-
एक जोडीदार हवा
जीवनात एक जोडीदार हवा...
जस सागराला नदीची साथ असते,
लाटांना किनाऱ्याची साथ असते,
रस्त्याना दिशेची साथ असते,
तसा एक जोडीदार हवा..
जस झाडांना वेलिचा साथ असते,
पानांना फुलांची साथ असते,
इंद्रवज्राला रंगाची साथ असते,
आकाशाला ढगांची साथ असते,
तसा एक जोडीदार हवा...
जस मावळत्या सूर्याला पर्वताची साथ असते,
उगवत्या चंद्राला पौर्णिमेची साथ असते,
सुर्यमालेला ग्रहांची साथ असते,
रात्रीला चांदण्याची साथ असते,
तसा जोडीदार हवा...
डोळ्यांना अश्रूंची साथ असते,
हृदयाला मनाची साथ असते,
कंठाला स्वरांची साथ असते,
तसा जोडीदार हवा जीवनात,
तसा एक जोडीदार हवा...-