दागिना
मंगळसूत्र असते भाग्याची निशाणी,
पुरुषांच्या जीवनाची स्त्रीच्या सौभाग्याची निशाणी,
भांगेत कुंकू माळते लावते कपाळावर टिकली,
कानात तिचे कुंडल, शोभे नाकात नथनी.
मनगटात तिने बांगडी घालावी,
घालावा हिरवा चुडा,घर्षन झाल्याने वाढतो
रक्तसंचार ना येत कधी अशक्तपणा,
शोभुनी दिसे हातात सुंदर असा दागिना.
साखर पुड्यातील अंगठी घालावी अनामिकेत,
तळहातातील ही बोट असतात विशेष,
त्या अंगठीतील तार जुळतात हृदयाशी,
पवित्र आत्म्याशी मिलन होत मनाच्या मनाशी.
जोडवे घालून त्यांचे बोट शोभून दिसतात,
त्यांचही नात त्या गर्भाशयाशी जुळतात,
पायात तीने घालावे चांदीचे पैंजण,
घरातील नकारात्मक गोष्टींना होत गर्जन.
असा देखावा असावा स्त्रीचा,
असा पेहराव असावा स्त्रीचा,
स्त्री चा जन्म हा स्त्रीलाच कळते,
दोन अनोळखी घराचे नाते तिच्यामुळे जुळते.
-
मृत्यूलाही जवळुन पाहिले
क्षणभंगुर जिवनात काहीच नाही राहिलें,
त्याने मृत्यूलाही आज जवळून पाहिले.
जगण्यात आता तशी मजा राहिली नाही,
ह्या दिसणाऱ्या देहावर कुणाचा अधिकार राहिला नाही.
म्हणतात, पंचतत्त्वाने शरीरही बनत,
पण शेवटी पंचतत्वातच विलीन होऊन जातं.
सूक्ष्म सूक्ष्म म्हणतो पण काहीच सूक्ष्म नसत,
त्या जळणाऱ्या देहावर कुणाचं लक्ष्य नसत.
हे राम म्हणतात वाचा सुदधा फुटत नाही,
तोवर त्या यमाचा पाश सुदधा सुटत नाही.
मरताना देव त्याला किती यातना देतो,
तोच त्याच्या मनाला सांत्वना देतो.
शरीराहुनी पवित्र आपली अंतरात्मा असते,
सूक्ष्म होऊनि परमात्म्याशी तल्लीन होते.
क्षणभंगुर जीवनात काहीच नाही राहिले,
त्याने मृत्यूलाही आज जवळून पाहिले.
-
स्पर्धा परीक्षेच्या तपस्येत
किती सारे भेटतात मित्र,
कोणी असतो हिरण्यकश्यप
तर कोणी विश्वामित्र...
ह्या तपस्येत असतात
रंभा, मेनका, उर्वशी,
सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार
प्री निघावी कशी बशी...
पोलिस भर्ती, तलाठी, आरोग्य सेवक
वर्षातून निघत असतात जाहिरात,
कुठला भाग निवडावा सतत असतो विचार
त्यामुळे झोप लागत नाही रात रात...
वाचनालयात बसून वाचावे कुठले पुस्तक
काही नाही समजलं तर फोडावे वाटते मस्तक,
एखादा प्रश्न नाही आला तर मेंदू देतो दस्तक
सतत वाटते मनाला जीवन झालं कोष्टक...-
आयुष्य झालं आहे मसाल्या सारखं
हिवाळयात पिकलेल्या वटाण्या सारखं,
जसं जीवनाची भिंत बांधायला विट पाहिजे
तस आयुष्य जगायला थोडं मीठ पाहिजे..!
आयुष्यात तडका द्यायला हवं थोड तेल
त्यामधे जिर मोहरीची सुद्धा होते मेल,
जीवनाची पोळी करायला थोड पीठ पाहिजे
तस आयुष्य जगायला थोड मीठ पाहिजे..!
आयुष्यातील चव आता तशी राहिली नाही
वाटते मजला आज लोकं तशी राहिली नाही,
चविसारखे बदलतात लोक हे एक मिथ्य आहे
वापरतात लोक मिठा सारखे हे एक सत्य आहे...!
-
एक जोडीदार हवा
जीवनात एक जोडीदार हवा...
जस सागराला नदीची साथ असते,
लाटांना किनाऱ्याची साथ असते,
रस्त्याना दिशेची साथ असते,
तसा एक जोडीदार हवा..
जस झाडांना वेलिचा साथ असते,
पानांना फुलांची साथ असते,
इंद्रवज्राला रंगाची साथ असते,
आकाशाला ढगांची साथ असते,
तसा एक जोडीदार हवा...
जस मावळत्या सूर्याला पर्वताची साथ असते,
उगवत्या चंद्राला पौर्णिमेची साथ असते,
सुर्यमालेला ग्रहांची साथ असते,
रात्रीला चांदण्याची साथ असते,
तसा जोडीदार हवा...
डोळ्यांना अश्रूंची साथ असते,
हृदयाला मनाची साथ असते,
कंठाला स्वरांची साथ असते,
तसा जोडीदार हवा जीवनात,
तसा एक जोडीदार हवा...-
पहिली भेट
वाटते मजला आज
भेटाविस तू....
सप्तरंगाच्या रंगासारखी बहराविस तू,
आकाशातल्या ताऱ्यासारखी चमकाविस तू,
वाटते मजला आज भेटाविस तू
निळ्या मखमली अंबराखाली
घडावी अपलीभेट,
मनातले प्रश्न
विचारावे तुला थेट,
पहिल्या भेटीला येशिल का तू..?
वाटते मजला आज भेटावीस तू..!
भेटण्याची वेळ तुझी अजून निश्चित नाही
तुझ्या प्रश्नाच्या माऱ्यांना मी वंचित नाही
पावसाच्या सरी सारखी बरसशील का तू..?
वाटते मजला आज भेटाविस तू
तुलाभेटण्याची आतुरता मनात आहे
जसे भटकणारे पक्षी रानात आहे
मावळता सूर्य ही मला सांगतो आहे
पहिल्या भेटीला किती रांगतोआहे
कुंद वाऱ्यासारखी येशील का तू
वाटते मजला आज भेटविस तू....— % &— % &-