QUOTES ON #INSTAMARATHI

#instamarathi quotes

Trending | Latest
20 DEC 2019 AT 17:58

उमगू लागलेत काही अर्थ आता,
तहानलेली उन्हे ही पहुडली आहेत..
डोकावताना हळूच लाजते आता,
मनात नटलेले किस्से चार आहेत..

माझ्या हास्याचा जादूगार तुच आता,
मनाचे संदर्भही उमगु लागले आहेत...
दिवसाच भेटलीत स्वप्ने काही आता,
झोपेचे बहाणे आता बेजार आहेत...

आठवणीत वावर तुझाच आता,
उदासीचे रंग नवरंगात बदललेले आहेत..
प्रत्येक गुपिताचे उमजलेले अर्थ आता,
थंडीत गारठण्या बेलगाम तयार आहेत...

निलाम करण्या परवड मनाची आता,
नजरांशी माझे करार फार आहेत...
रडवेले कण्हत जगलेले प्रत्येक क्षण आता,
तुझ्याचं ओढीची गाणी म्हणत आहेत...

-


9 FEB 2020 AT 17:14

असं हि होत असेल का रे....??

चार चौघांच्या गर्दी मध्ये... तुला मी आठवत असेल का रे ???
सहज रस्त्यावरून चालताना ...आपण भेटलेल्या ठिकाणी...तुझी ही नजर नकळतपणे वळत असेल का रे ???

मी कधी online येऊन तुला message करेल...ह्या विचारात तू ही बावरा होत असशील का रे ???
माझा बद्दलेला dp...माझे status...सारखे सारखे...तू न्याहाळत असशील का रे ???
मित्रां मध्ये गप्पा चालू असताना...अचानक माझी आठवण येऊन...तू अल्लडपणे हसत असशील का रे ???

माझी कमतरता क्षणों-क्षणीं तुला जाणवत असेल का रे ???
मी गुंतले जशी...तुझा ही जीव माझ्यात तेवढाच गुंतला असेल का रे ??

-


24 DEC 2018 AT 13:31

आठवणींच्या विचारातील माझे मन..☺️/😞

कधी कुणाची आठवण चेहऱ्यावर स्मित हास्य आणते तर,कधी डोळ्यात पाणी.,
कधी येतो नकळत त्याच व्यक्तीवर राग,ज्यांची गावी गाणी..१🤥

सुंदर विचाराने होते कधी कधी मन माझे शांत ..,🙂
तर कधी कुणाच्या नसण्याने राहावे लागते स्वतःमध्ये एकांत.२😐

ध्यास असतो स्वप्नांचा..,🤓
पण मनात घोळका मात्र नसलेल्या व्यक्तींच्या विचारांचा ..३🤔

अश्या आठवणींच्या विचाराचे माझे मन..,😇
स्वतःला विचारात पाडून करते नेहमी शहाणपण..४😒

-


3 DEC 2020 AT 19:51

आपलस कोणी भेटल की
गूज मनाचे खुलू लागतात
शब्द जरी अपुरे पडले तरी
भाव सर्व सांगुण जातात...

-




निखळताना तो तारा
गर्द मिट्ट नभी
आपल्यासाठी ती
सुख मागत असेल का?

दिवस-रात्र श्वासातून
तिलाच तर जगतोयं मी
त्याची पोचपावती म्हणून
एखादी उचकी तिला लागत असेल का?

-