वेदनांचे वावडे
नसते परंतु
चेहरा सांभाळताना
धाप लागे
- गुरु ठाकुर-
नशिबास कर हवे तेवढे वार म्हणालो.,
मानणार ना तरी कधी मी हार म्हणालो...
केला सौदा संकटांसवे आणि व्यथेला.,
खुशाल यावे उघडे आहे दार म्हणालो...
रिचवुन सारे तुडुंब प्याले अपमानाचे.,
दगाबाज दु:खालाही आभार म्हणालो...
खेळवुनी मज अखेर जेव्हा नियती दमली.,
डाव नवा मांडुन तिला तैयार म्हणालो...
रडलो नाही लढलो, भिडलो आयुष्याला.,
राखेतुनही उठलो अन याल्गार म्हणालो...!
- गुरु ठाकूर-
पाऊस आला कि...
सार्याच आठवणी ताज्या होतात
निःशब्द हुंदके अन् भावनांच्या सरींनी
बेधुंद भिजवून माझ्या होतात.
पाऊस आला कि...
मन होते अलगद ओले
घुमतो मेघनाद काळजात.. अन्
ओसंडून वाहतात टिपूर डोळे
पाऊस आला कि...
विजेची नक्षी चमके नयनात
बरसती भाव ओंजळभर
संवेदनांचे थेंब बरसती मनात
पाऊस आला कि..
मज तु आल्याचा हवाहवासा भास होतो
विरहाचे धागे क्षणांत विरघळतात अन्,
गुदमरत्या जीवनात श्वास येतो.
-
पाय असावे जमिनीवरती,
कवेत अंबर घेताना...
हसू असावे ओठांवरती
काळीज काढून देताना...
-गुरू ठाकूर-