२०२२ ह्या वर्षातला,
१ला दिवस आपल्या मैत्रीचा...
तुमच्या माझ्या नात्यातल्या,
विश्वास आणि खात्रीचा...
आपल्यातील नात असच फुलत राहो..
हे नवे वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे ,
आनंदाचे आणि भरभराटीचे जावो.
(काव्य क्षितिज)-
ती सर्वत्र आहे..
ती सर्वांमध्ये आहे..
ती सर्व रुपात आहे..
..ती *स्री* आहे.
ती तुमच्या जवळच असू शकते..
दरवेळी तिला मंदिरात
शोधायची गरज नाही..
कधी कधी ती तुमच्या
घरीही असू शकते..🚩-
एक दोर था ,
जब हमसे गुफ्तगू करणे के लिये लोग बेकरार रहते थे..
कंबक्त ...
ये वक्त सब कुछ बदल देता है!
-
आज दहीहंडी आहे. यंदा सण नसला
तरी ती भावना मनात रहायला हवी!
जो अडचणीत असेल,
त्याला पाठबळाची शिडी द्या,
ज्याने आव्हानाचे एक्के उचलले आहेत
त्याला उभं रहायला विश्वासाचा हात द्या,
एखादा आत्मविश्वासाचा मनोरा कोसळत असेल
तर झेलायला आपले
सामर्थ्यवान हात वर असुद्या..
शेवटी एकजुटीचा गोविंदा
मनात जिवंत रहायला हवा!
बोल बजरंग बली की जय...-
वादळ. (मुक्तछंद काव्य)
एक वादळ घोंगावत आहे,
आयुष्याच्या किनाऱ्यावर.
भावनांच्या बेधुंद लाटा स्वार होऊन,
आवेगाने किनाऱ्याला चुंबन घेत आहेत.
वेदनांचा पालापाचोळा पुन्हा उठलाय,
अन् सैरभैर झालाय
मन भरून रान.
हे संवेदनाच वादळ उचंबळून येणार.
तोपर्यंत अस्ताव्यस्त करणार मिटवून बंद केलेल्या आठवणींच्या घराला.
जोपर्यंत त्या घरातून,
विरहात दबलेली आर्त हाक बाहेर येत नाही.
अन् जेव्हा होईल रीते,
नयनांनी तुडुंब भरलेले तळे.
उचंबळून खळ खळ वाहणाऱ्या ,
भाव सरींनी.
तेव्हा कुठे होईल शांत, हे उठलेलं वादळ.
लपेटून मनातील भावनांचा कल्लोळ,
अन उतरेल ओझं,
आठवणींच्या गाठोड्याच.
Miss u Dad..
© (काव्य क्षितिज) Rajesh m sabale.-
सकाळी झोपेतून उठल्यावर मायबाप शेतकऱ्याची आणि
झोपायच्या आधी सीमेवर आपल्या छातीची ढाल करून आपल रक्षण करणाऱ्या
वीर जवानांची आठवण काढत जा...
हीच सर्वश्रष्ठ कृतज्ञता...
जय शिवराय🚩
©® Rajesh m. Sabale-
अस्वस्थ भावनांच्या चिखलात
माखून चिंब असशील...
तशीच ती ही भिजली असेल..
तिला अथांग भिजू दे,
तू मात्र स्वतःला सावर आणि तिच्यासाठी
नभ भरून बरस.-
कोणत्याही नात्याची सुरुवात ही आकर्षणातून होत असते...
आकर्षण मग ते शारीरिक असेल,
बौद्धिक असेल,आर्थिक बाबीला अनुसरून असेल,
एखाद्या कलेबाबत असेल किंवा
एकंदरीत व्यक्तिमत्त्वाला अनुसरून असेल...
दोन माणसं जवळ येतात ती आकर्षणातून...
पण त्या आकर्षणाचं रूपांतर प्रेमात व्हायला त्या दोन व्यक्तित्वांच भाव विश्व एक व्हावं लागत..
एकदा का ते झालं की त्यात ना जात आडवी येते ना वय...
अर्थात तुमच्या नात्यातली शुद्धता ही तुमच्या विचारांवर अवलंबून असते हे ही तितकंच खरं...
-
हृदय सागरात..
भावनांच्या लाटा उसळत आहेत...
कधी उंच..कधी सरळ..
ह्या फेसळत्या लाटा...
मायेच्या किनाऱ्याला भेटू इच्छितात....
पण..
तो किनाराच दिसेनासा झालाय...
माझा किनारा...-
पाऊस आला कि...
सार्याच आठवणी ताज्या होतात
निःशब्द हुंदके अन् भावनांच्या सरींनी
बेधुंद भिजवून माझ्या होतात.
पाऊस आला कि...
मन होते अलगद ओले
घुमतो मेघनाद काळजात.. अन्
ओसंडून वाहतात टिपूर डोळे
पाऊस आला कि...
विजेची नक्षी चमके नयनात
बरसती भाव ओंजळभर
संवेदनांचे थेंब बरसती मनात
पाऊस आला कि..
मज तु आल्याचा हवाहवासा भास होतो
विरहाचे धागे क्षणांत विरघळतात अन्,
गुदमरत्या जीवनात श्वास येतो.
-