खूप प्रयत्न करावे लागतात.,
शेवट पर्यंत एकत्र राहण्यासाठी...🤞🏻
नाही केलेसी प्रयत्न..,
डाव अर्ध्यावरी जातो संपूंनी...💔
मग आठवले कितीही तरी..,
परतून येत नाही ती व्यक्ती.,
आपल्या कुठल्याच हाकेवरती...- Muक्त मी ✨-
जेव्हा मुळापासून जपलेली नातींच.,
माघार घेत असतात ना..,
तेव्हा..,
मित्र नावाचं नातंच..,
आपल्याला आधार देण्यासाठी
पुढं सरसावलेलं असतं..! - Muक्त मी ✨-
होय खूप नशीबवान आहे मी...❣️
माझ्या मित्राला..,
माझ्यासाठी रडताना पाहिलंय मी..! - Muक्त मी ✨-
होय शिकलोय मी..,
त्याग करायला..,
अशा नात्यांचा..,
कधीकाळी त्यांनाच जपण्यासाठी.,
जीव की प्राण..,
एक करत होतो मी..! - Muक्त मी ✨-
कधी कधी एकटाच रडतोय., त्या मनासाठी.,
जे झुरतय नेहमी सगळ्यांसाठी..
आणि गुंतलंय नाती सांभाळण्यासाठी.,
पण काय सांगू., त्या वेड्या मनाला.,
मी तर माझीच वेळ हरवून बसलो आहे..,
माझं स्वतःचं मन राखण्यासाठी..! - Muक्त मी ✨-
जवळच्या माणसांचे., मन राखता-राखता...
स्वतःच्या मनाचा देखील विसर पडणं..,
म्हणजेच आपलं आयुष्य...! - Muक्त मी ✨-
रागात खूप काही बोलून जाण्यापेक्षा...
शांत राहून त्या नात्यामधूनच..,
निघून जाणे योग्य...! - Muक्त मी ✨-
संकटं देखील " थरथर " कापू लागतात..,
तो आपल्या खांद्यावरील
मित्रांचा " हात " बघून...! - Muक्त मी ✨-
जशी टाळी जर..,
एका हाताने वाजूच शकत नाही ना..,
तसंच मग..,
कुठलंही नातं एकाच्याच जबाबदारीवर
टिकू ही., शकणार नाही... आणि...
बहरू ही., शकणार नाही...- Muक्त मी ✨-