काट्यात वाढले मी
काटेच अंत माझा
फुलांच्या रक्षणा
निस्वार्थ श्वास माझा
दुःखास नाही जागा
सुख उरात माझ्या
शब्द बोलला कडु कधी
परि काळजीत भिजलेला
तक्रार आहे थोडी
अस्तित्वास प्रश्न माझ्या
वळले झ-यापरी मी
समजण्या कोणी नाही-
स्वप्ने खट्याळ होती
खिल्ली उडवत गेली
साठलेल्या वेदनांना
थोडी हवा घालून गेली
उरलेल्या आयुष्याची
कथाच वेगळी झाली
ज्या हसल्या वेदना स्वप्नांच्या
त्या स्वप्नांचीच होळी केली...-
शब्दांसह संसार काही खेळ नाही
त्यांशिवाय आयुष्याला मेळ नाही
श्वास, ध्यास, अन् विश्र्वास शब्दचि आता
जगाच्या शुल्लक वादासाठी काही वेळ नाही.-
कधीतरी व्यक्तींपेक्षा वस्तू मोठ्या गोष्टी
अगदी सोप्या पद्धतीने शिकवून जातात.
आता Earphone🎧 बघा ना,
Earphones🎧 आपल्याला शिकवतात,
लोक काहीही म्हणू देत, पण..आपण जर ठरवलं
आपल्याला नेमक काय ऐकायचं,
तर बाकीचं कसलाच आवाज आपल्याला ऐकू येत नाही.🙉
आपल्या समोर कोणी चिडून बोललं🤬
कोणी आपली टिंगल टवाळी जरी केली🤪
तरी आपल्याला काहीच फरक पडत नाही..
उलट ते माकडचाळे वाटून आपण हसायला लागतो😂
म्हणून सांगते, लोक काही म्हणू देत...
आपण मात्र Earphones🎧 सारखं राहायचं
ऐकायचं ते ऐकायचं आणि बाकी सोडून द्यायचं..!😍
❤️❤️ Vigorous vibsss❤️❤️-
मावळणारा सुर्य
पुन्हा उगवणार असतो
जो स्वतःला सावरतो
तो कधीच हारत नसतो..!!-
जेवढे दिले देवाने
तेही खूप जास्त आहे
थोडे तरी वाटण्याच्या
प्रयत्न करावा मनाने
नेहमी साठवणा-याला
कितीही असले तरी कमीच...!!-
आयुष्याची लढाई लढतांना
हारने जिंकने असे काही नसते,
फक्त महत्त्वाचे असते,
की आपण त्यातून काय शिकतो।
-
उगाच छळतो आपण स्वतःला,सगळं काही आधीच ठरलेलं असतं..
कोण किती काळ सोबत आपल्या हे आयुष्याच्या पाटीवर कोरलेलं असतं.
मन जिथे सतत रमत असतं तेच नेमकं तात्पुरतं आपल्या आयुष्यात असतं..
कळलंय आयुष्य जरासं मला .. इथे सारं काही क्षणभंगुर असतं.....
-
मान्य आहे जगण्यासाठी पैसे हे हवेच
पण सुख ही तितकेच महत्त्वाचे आहे,
कारण असं म्हणतात की शेवटचा श्वास घेण्यापूर्वी आपल्या आयुष्याचं संपूर्ण Flashback दिसतं,
जे बघून डोळे पाणावतात.
ते पाणी आनंदाश्रु असावेत की सुखी समाधानी न राहिल्याचे दुःख
हे आपणच ठरवायचं असतं...
-