QUOTES ON #शिवराज्यभिषेक_सोहळा

#शिवराज्यभिषेक_सोहळा quotes

Trending | Latest
5 JUN 2020 AT 23:48

⛳🚩🚩😎🚩🚩⛳
कपाळी चंद्रकोर शोभते भारी,
आम्हा मराठ्यांची ही तऱ्हाच न्यारी
भगवा झळकतो आमुच्या दारी
कणा-कणांत राजे वास करी.

आपुला राजा ३३ कोटींत भारी
जगात त्यांचे लाखो पुजारी,
देव रुपी जन्म घेतला भूवरी
छत्रपती पदवीचे ते मानकरी.

राज्याभिषेकाची रोषणाई रायगडी
मानाचा मुजरा त्या पुढारी,
होती लोकशाहीची हि सुरुवात खरी
ह्रुदयात कायमची छाप टाकणारी.

-


5 JUN 2020 AT 16:37

We have seen Many Coronation Ceremony's of King's In History, But
the only "Chhatrapati Shivaji Maharaj" was the such King Who's Coronation Ceremony is Celebrated with Great Pomp in today's Era also.

-


5 JUN 2021 AT 15:36

*राजा शिवछत्रपती*

महाराष्ट्राला भग्या लाभले
शिवाजी राजे जन्माला आले
ऐकून श्री रामाचे धडे
शिवाजी राजे घडले

आला पुण्य सोहळा 6 जून चा
शिव राज्य अभिषेकाचा
शिव राज्य अभिषेक केला
नवा राजा प्रजेला लाभला

चालली होती गुलामगिरी
मुग्लांची होती दादागिरी
चालल्या मराठ्यांचा तलवारी
दूर पळवली गुलामगिरी

केला न्याय साऱ्या प्रजेवर
घडवले स्वराज्य स्वहिमतीवर
मुठभर मावळे घेऊन लढले
अशे शिव छत्रपती घडले.

-


6 JUN 2020 AT 16:28

S A G A R K A R A N J A V K A R

-


6 JUN 2020 AT 10:14

प्रत्येक मराठी माणसाचे ईमान आहे रायगडाच्या पायथ्याशी,
पराक्रमाची दिशा आणि परिभाषा शिवराय,
पराक्रमाची अर्थ आणि शर्थ शिवराय,
अश्या या राजाला त्रिवार मानाचा मुजरा,
अनादी अनंत काळापर्यंत साजरा होईल राजेंनी केलेला प्रत्येक सोहळा....

- Ron Akole

-


6 JUN 2020 AT 15:35

छत्रपती शिवाजीराजे
शहाजीराजे भोसले यांना मानाचा मुजरा
६ जून १६७४ रोजी शिवभूमी रायगड
॥ शिवराज्यभिषेक ॥
सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

-


6 JUN 2020 AT 10:15

रायगडाच्या मातीत आज उभा ठाकला
राजा आमुचा आज जगाने मानला
जग जिंकणारा राजा सर्वांच्या सेवेशी उभा राहिला
सप्तनदीच्या अभिषेकाने नसानसात स्वराज्य भिनला
प्रजेच्या सुखापुढे ना कोणता जातधर्म जुमानला
असा माझा राजा सर्वांचा आपुला
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

-


6 JUN 2021 AT 13:17

||छत्रपती शिवाजी महाराज||
या महाराष्ट्राचं आराध्य दैवत,
ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेने व थोर पराक्रमाने या महाराष्ट्राची भूमी पतितपावन झाली,
ज्यांच्या सिंहगर्जेनेने अख्ख हिंदवी स्वराज्य पेटून उठलं,
ज्यांच्या घोडदौडीपुढे सर्व सह्याद्रीचे कडे नतमस्तक झाले,
ज्यांच्या दीप तेजाने स्वराज्याचे तोरण दारोदारी दैनिकमान झालं अशा त्या श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा मानाचा मुजरा.
झाले बहु होतील बहु परंतु यासम हाच.
#शिवराज्याभिषेक_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा

-


6 JUN 2020 AT 12:58

शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा

-


6 JUN 2020 AT 10:01

शिवराज्याभिषेक सोहळा- किल्ले रायगड...
शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्राचा सोनेरी पुत्र जन्मला. ज्याने महाराष्ट्राचा सुवर्ण इतिहास पूर्ण आर्यावर्तात घडविला. वयाच्या सोळव्या वर्षी रोडिडेश्र्वरावर स्वराज्याच तोरण बांधले. ज्याने मुघल पातशाही विरुध्द बंड पुकारले आणि मराठी मातीचा दिंडिम फडकवला तो म्हणजे मराठी सेनाचा शिलेदार आणि महाराष्ट्राच आराध्य दैवत क्षत्रिय कुलावतं छ्त्रपती शिवाजी महाराज. आजच्या दिनी महाराज यांचा सौर्वभौम राजा म्हणून उभा जगाला परिचय झाला.एक कुशल प्रशासक, अर्थतज्ञ , युद्धनीतीत पारंगत, दूरदृष्टी असणारा आणि अठरा पगड जातींच्या लोकांना एकत्र घेवून लोकशाही व्यवस्था स्थापून राज्य करणारा उभ्या जगतात कोणी राजा होणे न्हवे..पण त्यांच्या वारसा लोप पावत आहे . महाराजांची संपत्ती गड किल्ले आज दुर्धर पडली आहेत. म्हणून प्रत्येक महाराष्ट्रवासी यांनी विचार करायला हवा..

झाला अनंत प्रकाश तो मराठी मातीचा..
उजविळले अंधारलेल मन मराठी वीराच..
दिली झुंज जुलमी राजवटीशी अन् उभारली गुडी स्वराज्याची..
आराध्य दैवत आजन्म मराठी मातीच..
असा राजा पुन्हा होणे न्हवे..
जाणता राजा पुन्हा होणे न्हवे..

-