कोणाच्या प्रेमात रंगलेली राधा नाही...🤭
रूक्खिमीनी मीरा राणी नाही...😊
शंकरासाठी तप करणारी...
सती पार्वती नाही....🤗
मी रामाची सीता होईन....😜
किमान सुपरनखेचे नाक👃...
कापलं जाईल😅
-
जमतयं आता मला भावनांना डांबून ठेवायला
उनाड मनाला दावणीला बांधायला
मी कोण आहे ह्याची पर्वा नाही कुणाला
सगळ्यांना फक्त काम हवं आहे निघायला
मी ही आता....मोजून जगते
हसायच्या आधी... हसू तोलून बघते
सगळ्यांच्या मर्ज्या आहेत मला सांभाळायच्या
जमतयं आता मला भावनांना डांबून ठेवायला
घराघरात मी...सारखीच असते
जूनी असो वा नवी....मी कुणीच नसते
माझ्यावाचून जे अडतय ते सावरायचय मला
जमतयं आता मला भावनांना डांबून ठेवायला
जोपर्यंत शांत... मी लक्ष्मी असते
जराकाही बोलली... तर भवानी बनते
दोन्ही रूपात वसते देवी, तरी लपवायचयं एकीला
जमतयं आता मला भावनांना डांबून ठेवायला
जमतयं...लिहून मन मोकळं झालं की कागद गुंडाळून ठेवायला-
विचार तुझा सदा मनात असायचा
आठवतो तुझा नखरा तो रूसायचा
तूझी चूक मीच कबूल करायचा
मी न खाता तूला घास भरवायचा
जो तुझ्यासाठी झूरायचा
जो तुझ्यासाठी मरायचा
जो तुझ्यासाठी हसायचा
त्याला काही हक्क नाही ठेवला बोलायचा
खरचं मी तुझा होतो का
तुझ्यासाठी मी कोणीच नव्हतो का
-
कोणाचं अडतं कोणासाठी
कोण कोणासाठी थांबत
कोण जातं सोडून अन
कोण कोणासाठी रडतं
कोण आहे वैरी अन
कोण आपला सोबती
कोणी नाही कोणाचा इथे
सगळेच आहेत स्वार्थी-