आयुष्याला द्यावे उत्तर...
सुखदुःखांचे लावून अत्तर...
संकटासमोर ना झुकणार...
भले केले त्याने आयुष्यात कित्येक वार...
ना यशात मी हुरळणार...
ना अपयशात माघार घेणार...
ना सुखात दुःखाला विसरणार...
ना दुःखात मी स्वतः कधी खचणार...
कित्येक रुपात करोत वार...
मी नेहमीच उत्तर देण्यास तय्यार...
कित्येक येतील नी जातील
पण मी न भुल थापांना फसणार...
जे आहे जसे आयुष्य ते
तसे मी स्विकारणार...
आहे ते सोडून नसत्याच्या
मागे न कधी मी पळणार...
संकटास सांगेन मग ठणकावून
या आता कितीही बेहत्तर...
मी आहे तय्यार...
सुखदुःखांचे लावून अत्तर...
आयुष्याला देण्या उत्तर...
-
24 NOV 2018 AT 10:20
24 NOV 2018 AT 14:32
#आयुष्याला द्यावे उत्तर....
जरब बसवावी संकटाना..
रोखून धरावी करडी नजर...
विश्वास ठेवून मनी आपल्या.....
आयुष्याला द्यावे उत्तर.....!!
वादळे येतात अन् जातात..
आपण शीड तुझे पक्के धर...
लाटा झेलून हो त्यावर स्वार...
आयुष्याला द्यावे उत्तर......!!
धडा शीक प्रत्येक नवा....
खोचून ठेव आता पदर...
असू दे शब्दांनाही धार....
आयुष्याला द्यावे उत्तर.....!!!
झेप घे तू आकाशी....
पंख आपुले नभी पसर....
रोख ओळखूनी हवेचा जोर...
आयुष्याला द्यावे उत्तर......!!!
पुढे पुढे चालत रहा...
नाहीच मुळी आता माघार....
नजरेत असू दे तुझ्या करार....
आयुष्याला द्यावे उत्तर.....!!!!
-
16 JAN 2018 AT 7:31