QUOTES ON #आजोळ

#आजोळ quotes

Trending | Latest

पूर्वमुखी छान दिसे चिरेबंदी मोठा वाडा
रम्य छोटा वाहतसे समोर पठारी ओढा

मोठे पिंपळाचे झाड मुंजोबाही अग्नेयास
गोड पाणी खोल आड समोरच अगत्यास

अंगणात दोन गोठे गुरे दावणी पुष्कळ
लाल्या नाग्या बैलांसवे गाई म्हशीही बक्कळ

ओसरीची काय शोभा तसबीरींची हो ऐट
भारतीय बैठकीचा सुंदर दिसतो थाट

चौक मोठा मध्यभागी चार बाजू खोल्या चार
कोठीघर माजघर पाकघर देवघर

भांडी पितळ तांब्याचे रेखीव सुंदर खूप
धान्य सारेच घरचे दूध दही शुद्ध तूप

आजोबांची चालतसे देव पूजा मंत्रोच्चारी
सोवळ्यात आज्जीकरे स्वयंपाक चुलीवरी

प्रसन्नचित्त होतसे वाड्याचे वातावरण
घमघमाटी वासाने शिजे आमटी पूरण

मामा राबे शेतामध्ये शिदोरीला मामी जाई
सांजवेळी परतून बैलगाडी सवे येई

-


20 OCT 2019 AT 12:55

:माझे आजोळ:
माझे आजोळ!!आठवताच...
आठवतो तो पार... पार म्हणजे
आजचे सि.सि टि व्ही.कॅमेरे. ..प्रेमळ डोळे तेव्हाचे
गावात जाताच विचारपुस करून गालावरून थरथरते
हात फिरवणारे... व खिशातुन खाऊ देणारे!!!
माझे आजोळ !!आठवताच....
आठवतो तो वाडा... ओसरी.. त्यावर रंगलेला गजग्याचा डाव... चंफुल... नी काय काय... खेळताना
तळलेल्या खारूडया.. मामीचा प्रेमाचा आग्रह... धापु- डयाचा.. नी खमंग भाजलेले पापड... आ हा हा.. मंतरलेल!!स्मृतीजाळ ... तरळतात आज ही डोळ्यात... का मोठे झालो आपण म्हणुन!!!
माझे आजोळ आठवताच!!!आठवती आम्रवडी, गुळ पापडी, नी भेंडवडी पण... शाळुची भाकरी क-हाळाची
चटणी वर तेलाची धार... कोवळ्या उन्हात बसुन केलेला नास्ता... व लगेच नदीवर आपटलेल धुण... खडकावर खेळलेली धम्माल... आठवांचे काहुर माजवते... कारण वाडा वाट पहातोय आजही पण...
तिथे खेळलेळ्या चिमण्यांना वेळच नाही .. आज
ऋणी आहे त्या आठवांची त्यांनी ओंजळीत माझ्या
आजोळाच्या स्मृती कोरल्या... त्या सख्या, ती नाती,
नात्यातील ओलावा कोरणारी आजोळातील प्रेम , संस्कार शिदोरी नी त्या आठवांना आठवल्यास पोटात
पडलेला आजचा खड्डा... सोबत नयनातील अश्रु...

-


20 OCT 2019 AT 22:09


अजूनही स्वप्नात येते..
पापणी ओलावते..

मोठे होण्याच्या अट्टाहासाची
किंमत अशी चुकवते आहे!!

-


20 OCT 2019 AT 10:33

माझं आजोळ

दत्त मंदिराच्या आवारात
सुंदर माझं आजोळ
टाळ चिपळ्यांच्या नाद
नि वर रविराजाचं उन कोवळ
आजी आजोबा समवेत
असे मी प्रभाती मंदिरी
घासभर प्रसादाने
शांत वाटे उदरी
सौ. वीणा जोशी🌱

-