QUOTES ON #आगरी

#आगरी quotes

Trending | Latest

आगार वाटन सागर वाट
सागर वाटन आगर वाट
आगरी आनी कोली लोकांची
कवी, लेखक, कलाकारांची
समिन्दराच्या किनारची वाट
मीठ-माशांचे सहवासात
भूमी पुत्रांचे हक्का सोबत
क्रांतिकारांची नवीन वाट
खारट, तुरट, तिखट भारी
तरी तिची हाय न्यारीच गोरी
जगान तिचा येगला थाट
एकविरा आईच्या आशीर्वादान
खंडोबा देवाचे आशीर्वादान
सुखानं धावू दे थाटामाटात

-


4 MAY 2020 AT 11:13

Lockdown वारोला
पण लोखांचे अले जिवाव....
पावसाळा आसता त
मास तरी भेटलस्त चिवाव....

-


5 SEP 2020 AT 12:09

परतेक गोष्टीवल्या राजकारण कराची
सवय ह ये नेत्याना....
एक आन्डा घालून गाव भ गोंगाट भराची
सवयच ह कोखेऱ्याना....

-


9 OCT 2018 AT 21:25

पोरीच्या रं बापा
तुला कसली चिंता हाय ,
आरं लक्ष्मी चे रूपानं
तुझी पोरगी पाठीशी हाय.

शिकली सवरलेली पोर तुझी
तुला अभिमान का वाटत नाय ,
पोऱ्या तुझा वाईट संगतीन परून
आयुष्य बरबाद कराला लागलाय.

आरं तिचेमुलच हाय
तुझे घराला घरपण,
जवा सासरी जाईल ती
तवा विचारान परशिल तू पण.

-


9 JUL 2020 AT 11:09

कविता करणारा प्रत्येक व्यक्ती
प्रेमानं नसते....
प्रेम करू शकत नाय
म्हणून तो लिवित आसते....

-


1 JUL 2020 AT 10:05

वारी पंढरीची
ओढ विठुरायाच्या भेटीची....
तहान , भूक विसरून गेलो
आस लागली मनाला विठ्ठल दर्शनाची....

-


6 MAY 2020 AT 8:25

मटण-मच्छी भेट नाय
ना सुक्की मच्छी पण खपली...
१००० रु किलो जरी मटण इकला ना
तरी लोखा झेवून येतील टोपली...

-


7 APR 2021 AT 15:04

कुऱ्हाडी , कोयत्यांचा
जेला जमाना...
आता धार अले
शब्दांना...

-


12 SEP 2020 AT 11:47

कनच्या र या जाती
ना कनच ये धर्म....
देवाचे सामनी सगली सारखीच आसतान
देवाला आवारतान फक्त चंगल कर्म....

-


30 AUG 2020 AT 12:09

आयुश्यान संकट
लाख येतील....
तेच संकटांव मात कर
तिच संकट तुला अनुभव म्हणून कामी येतील....

-