QUOTES ON #सुनिता

#सुनिता quotes

Trending | Latest
7 OCT 2022 AT 18:25

" जिंदगी की सच्चाई "

इन्सान कहता है की पैसा आये तो मै कुछ करके दिखाऊं
पैसा कहता है की तू कुछ करके दिखा तो मै आऊं..

भगवान का दिया कभी अल्प नही होता
जो टूट जाए वो संकल्प नही होता

हार को लक्ष्य से दूर रखना क्योंकी ,
जीत का कोई विकल्प नही होता

धरती पर भगवान की तलाश है
मालिक तेरा बंदा कितना नाराज है

क्यूं खोजता है भगवान को , जबकि
भगवान के दुसरे रुप में , तेरे मां बाप
तेरे इतने पास है....

सुना

-


6 SEP 2022 AT 17:24

प्रेम म्हणजे तू....!

प्रेम म्हणजे तू
जो सतत मला आवडणारा
प्रेम म्हणजे तुझा सहवास
जो कायम हवासा वाटणारा....!

प्रेम म्हणजे आनंद
जो नेहमी तुझ्यात भेटणारा
प्रेम म्हणजे गोड हास्य
जे नेहमी तुझी आठवण करून देणारा....!

प्रेम म्हणजे तुझा अलगद स्पर्श
जो सतत माझ्या मनाला भुरळ पाडणारा
प्रेम म्हणजे आपल्यातला विश्वास
जो कायम आपल्या दोघांत राहणारा....!
सुना

-


14 OCT 2022 AT 17:25

कुणीतरी हवं असतं...!

कुणीतरी हवं असतं...
सोबत आयुष्याची वाट चालायला
जो हात देईल
कधीही साथ न सोडायला.

कुणीतरी हवं असतं....
जीवाला जीव देणारा
स्वत:च्या हृदयात
निर्वीवाद स्थान देणारा.

कुणीतरी हवं असतं...
दिलखुलास हसणारा
काहीही न बोलता
बरंच काही समजुन घेणारा.

कुणीतरी हवं असतं...
मनमोकळे बोलायला
अन.... भरून आलं की
मनासोबत रडायला.
सुना

-


3 NOV 2022 AT 19:33

न बोलता ही बोलणे तुझे
मनास माझ्या उमगते
या हृदयी चे त्या हृदयी
सहज कसे समजते...

शांत अबोल मन हे
असेल दूर रे जरी
मलाच ना कळेना काही
तुझीच आठवण का करी...

फिरूनी येतील ते दिवस
वाट ही सारखी पाहते
आसुसलेल्या नयनांतुनी
अश्रुंची धारा ही वाहते...
सुना

-


19 OCT 2022 AT 22:01

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच नका विसरू ,
जी व्यक्ती तुमच्यासाठी सारं काही विसरायला तयार असते.

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच नका दुरावू ,
जी व्यक्ती तुमच्यासाठी सारं काही दुरावायला तयार असते.

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच नका दुखवू ,
जी व्यक्ती तुम्हाला काही झालं तरी स्वत:पेक्षा जास्त जपते.

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच नका गमावू ,
जी व्यक्ती तुमच्यासाठी कसलाही त्याग करायला तत्पर असते.

आयुष्यात त्या व्यक्तीकडे कधीच पाठ नका फिरवू
जी व्यक्ती साऱ्या जगाने आपल्याकडे पाठ फिरवीली
तरी आपल्या सोबत असते.
सुना

-


15 APR 2024 AT 21:56



श्रावणमास चाहूल लागता
येती चोहीकडे मेघ दाटूनी
झर झर बरसती धारा
जाते अवनी भिजूनी

पडती थेंब टपोरे ऐसे
जणू वाजती अल्लड पैंजण
नेसूनी हिरव्या शालूत नटली
भेटण्या आतुर सखा साजण

बहरली वने रानोरान
बहरली पाने फूले
स्वप्ने लोचनात घेऊनी
मन हे झोकात डुले

मन कोवळे, उन कोवळे
कृष्णमेघ ही सावळे
इंद्रधनू तो नील नभात
भूवरी तरंगती जलकमळे

हिरव्या गर्द फांदीवरी
निनादे कोकिळेचा स्वर
व्रतवैकल्याचा श्रावणमास
सुवासिनीस आठवे माहेर

श्रावणातला गारवा
चिंब भिजवी तनामनास
नाचती धुंद मन मयूर
आठविता प्रिय सख्यास

-


12 JAN 2024 AT 19:39

रे सखया , तुझ्या जाण्याने काय बरं असं घडणार
पण हृदय माझं नक्कीच कोलमडणार...

रे सखया, तुझ्या जाण्याने किती मी विचार करणार
मनातल्या कोपऱ्यात तुलाच जपुन ठेवणार...

रे सखया, तुझ्या जाण्याने किती दिवस दु:ख मी करणार
आसुसलेल्या नयनाने वाट मात्र तुझीच पाहणार...

रे सखया, तुझ्या जाण्याने तुच सांग कशी बरं मी हसणार
ओठी हास्य तरीही मन माझं आतुन रडणार...

रे सखया, तुझ्या जाण्याने माझं आयुष्यच सारं बदलणार
आकाशातला चंद्र ही मज सुना सुना वाटणार...

रे सखया, तुझ्या जाण्याने कविता माझी कशी फुलणार
शब्दसरीता होऊन भावना कागदावर उमलणार...

-


17 OCT 2023 AT 18:27

कळीचं उमलंणं
ठाऊक असतं फूलाला
हळूच कुजबुजते ती
कवेत घेशील ना या कळीला

असतील काटे जरी सभोवती
काळजी घे बोचणार नाही मला
हृदयाच्या कुंपणात बंदीस्त करून
सांग ठेवशील ना रे मला

वाऱ्याबरोबर मलाही
झोकात डोलायचं आहे
फुलपाखराच्या स्पर्शाने
सुगंध दरवळायचा आहे

कितीसं आहे रे
या कळीचं जगणं
तरीही आवडतं मला
मनापासून तुझं जपणं

फूल होतांनाही
त्रासातून जावं लागतं रे
कुणी तोडेल का मला
याचच भय सलतं रे

नको वाटतं फुलणं आता
मन संवेदना तुटल्या रे
स्वच्छंद बहरायचं होतं मला
न उमलणारी मी दुःखी कळीच रे...

-


2 AUG 2022 AT 12:34

कधी कधी कळत नाही
खुप उदास वाटतं ,
जेव्हा या वेड्या मनाला
कुणी सावरायला नसतं...

हळवं असतं मन
कुणासाठी एवढं झुरतं
का हे दु:ख माझ्या
मनात खुप सलतं....

आस असते जिवाला
कुठे धूर जळतो
जुळलेला प्रेमधागा ही
क्षणात तुटून गळतो...

आसुसलेल्या नजरेनी
वाट पाहत होती
एक एक हुंदका दाटत
परि आस उरली नव्हती...
सुना

-


26 FEB 2024 AT 17:44

पुढील रचना कॅप्शन मध्ये

-