किलबिल किलबिल पक्षी वनी बोलती
मानवा तुझी दुष्ट होत चालली रे नीती
राहावे सदा द्वेष न बाळगता प्रेमभावाने
धर्मभेदाने पेटवू नये कधीच जातीपाती
राजकारण करू नये कुटील वैरभावाने
विसरतच चालला माणूस न्याय व नीती
युद्ध दंगली वाढले सर्व धर्माच्या नावाने
त्यापेक्षा बरी आम्हा प्राणी पक्ष्यांची नाती
जातपात न करता,थवाच राहे एकभावाने
मीडिया वरून पेटवत नाही सुडाच्या वाती
फक्त गरजेपुरते अन्न मिळवतो ऐक्यभावाने
साठवत नाही तुम्हासम सोनं चांदी व मोती
@सुनीता रमेश🙏
-
प्रि💐प्रिय शिक्षिका तु आहेसच, तुझ्या विद्यार्थ्यांची
या 💐यारी निभावतेस झिम्मातील सर्वच सख्यांची
दे 💐देते मुलांना शिकवण संस्कार आणि मुल्ल्यांची
श 💐शतायुषी निरामयता लाभो ही कामना सख्यांची
मु 💐मुख्य ध्येय ज्ञानदान रचते माला सुंदर काव्यांची
ख 💐खबरदारी घेतेस जपण्या आप्त इष्ट सगळ्यांची
अशा ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या माझ्या
गोड मैत्रिणीला 🥰वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा🎂
तुझं साहित्य दर्जेदार आहेच त्याच्यासाठी वेळ काढ.
तुझ्या लिखानाला पण खुप साऱ्या शुभेच्छा. 💐💐
-
कळा ज्या लागल्या बघा जिवा
दुश्मनांची छाटावी वाटली ग्रीवा
कर्नल सोफिया कुरेशी थलसेना
सुचक सर्जिकल स्ट्राईकची निवा
व्योमिका सिंग कमांडर वायुसेना
दोघींच्या पूरकच ठरल्या जाणीवा
आठवली का श्रीरामांची वानरसेना
पहलगाम हल्ल्याने कळल्या उणीवा
कुणीही त्यातून अजिबात सावरेना
ऑपरेशन सिंदूर ने तोडल्या उणीवा
अभिमान आम्हा अशी हिंदवी सेना
पाकिस्तानी नमले कटली जणु जिव्हा
@सुनीता रमेश 🙏
-
आईबाबाची लाडाची लेक मी आजवर एकटी होती
माझ्या मनाची मी मालकीण आजवर जगली होती
शिक्षणानंतर नातेवाईकांकडून प्रस्ताव येऊ लागले
आजवरची माझी एकांताची स्थीती बदलली होती
एकांताचा आरंभ कैसा?आजवर मनाप्रमाणे वागले
एका पसंतीच्या निर्णयानेच नवी होणार होती नाती
कशी करू स्वागता मग वेध मनाला नव्याचे लागले
स्वप्नांत रंगून विचार करून वाटे कसा असेल साथी
आईबाबांच्या दूर राहण्याचे बळ देवाला मागू लागले
अखेर एक स्थळ निवडून मामाने सुपारी घेतली हाती
आईबाबांच्या ह्रदयात मात्र धडधडच व्हायला लागले
जगरहाटीप्रमाणे त्यांना कन्या लावावीच लागते वाटी
@सुनीता रमेश 🙏
-
आज पुन्हा येणार नाही ही कामवाली बाई
खाडे करून तीला आठ दिवस पुरले नाही
भांडे धुणी करून करून हात खराब झाले
मागच्याच महिन्यात दहा दिवस आली नाही
उन्हाळ्याच्या दिवसात पाहुणचार फार झाले
आमरसाची अजुन पुर्ण नाही झाली सरबराई
मुलांचे मळालेले ड्रेस दोन बकेट जमा झाले
वाशिंग मशीन बिघडून अजुन सुरू झाली नाही
रोज रोज स्वयंपाकाने माझे गर्मीने हाल झाले
वन्स आल्यामुळे पतीचे माझ्याकडे लक्ष नाही
नेहमी आरामच असतो ना असे मला म्हणाले
कठीण कठीण किती बघा हे पुरुष हृदय बाई
@सुनीता रमेश 🙏
-
मी काय म्हणत होते,अहो ऐकलं का?
आज किराणा सामान आणणार का?
येतांना एखादी भाजी घेऊन येणार का?
थोडं आम्रखंड व वडी पण आणणार का?
माझी प्रेसची साडी येतांना आणाल का?
मुलांचे नमकीन व खाऊ घेऊन येणार का?
आईंची औषधं त्यांना आजच हवीय बरं का?
माझं थोडं स्टेशनरी सामान आणा बरं का?
ब्युटी पार्लर सुरु आहे का बघुन याल का?
गिरणीतलं पीठ तेव्हढं आणुन द्याल का?
माझं एकतरी काम तुम्ही कधी ऐकाल का?
सर्व प्रश्नांचे एक उत्तर हो हो आणतो बरं का.
@सुनीता रमेश 🙏
-
मंत्र सुखी राहण्याचा तुम्ही घ्या ध्यानी
तोंड असून बिनकामी उघडू नये कोणी
मंत्र सुखी राहण्याचा घ्या तुम्ही ध्यानी
सुट्टीनंतर साहेबांपुढे जाऊ नये कोणी
मंत्र सुखी राहण्याचा घ्या तुम्ही ध्यानी
मुलगा सुनेच्या संसारी राहा मित्रावानी
मंत्र सुखी राहण्याचा तुम्ही घ्या ध्यानी
आय काय खर्च पाहून करा दानापाणी
मंत्र सुखी राहण्याचा घ्या तुम्ही ध्यानी
सत्य सुंदर शिवाला विसरू नये कोणी
मंत्र सुखी राहण्याचा तुम्ही घ्या ध्यानी
साधना करावी रोज डोळे मिटून दोन्ही
@सुनीता रमेश 🙏
-
एक तारी संगे आम्ही एकरूप झालो
विठ्ठलाच्या भजनी न्हाऊनी निघालो
चंद्रभागेचा काय वर्णू आनंदी आनंद
विठ्ठल रखुमाई संगे एकरूप झालो
माता पीता आमचा साक्षात पांडुरंग
भेट त्त्यांची होताच कृतकृत्य झालो
भाविकांचा मेळा ध्वजा पताका संग
गजराच्या घोषातच स्वरातीत झालो
काया आहे पंढरी आत्मा हा पांडुरंग
नाम नादाकार आम्ही ब्रम्हरूप झालो
नाम रूप असे जीवा शीवाचा स्वानंद
ज्ञान कर्म भक्ती योगात जणु जुळालो
@सुनीता रमेश 🙏
-