नाही जाहला जगी ऐसा राजा, न कोणी दूजा शिव छत्रपती,
युगंधर तो रणवीर तो, कैवारी बहुजनांसी तो शिव छत्रपती.. ।
व्हावे लिन सदैव तव चरणी, हे अधिपती शिव छत्रपती,
घ्यावा मानाचा त्रिवार मुजरा, जिजाऊ-शाहू सुत शिव छत्रपती.. ।
शोभे हाती तलवार तळपती, ढाल रयतेची माझा शिव छत्रपती,
जे का रंजले गांजले पिता तूच माताही हे शिव छत्रपती.. ।
जाहले प्रकाश होऊन रवि तेजाप्रति हे शिव छत्रपती,
गेला दूर अंधकार तो अगमनाने तुमच्या हे शिव छत्रपती.. ।
नाम अंतरी तुमचे देई बळ हाती, जीवनदाता हे शिव छत्रपती,
राहील अशीच अमर तव कीर्ती, हे अधिपती भूपती राजे शिव छत्रपती.. ।-
13 FEB 2020 AT 12:02
10 JUL 2020 AT 22:36
अवतरून भू वरती धन्य जन्म जिजाऊंचा केला
चरण स्पर्शाने तुझ्या श्री रायगढ़ पवित्र झाला
जरब शहाजींची कृपा त्या भवानीची
कर्तव्याला अपार तुझ्या साक्ष खुद्द सह्याद्रीची
तूफानाला धूळ चाखवी एकची तू महान
मातृभूमिचा सम्मान तुची सकल राष्ट्र अभिमान
आभाळागत शौर्याची रयतेच्या राजाची
गाथा ही शिवरायांची त्या बत्तीस मण सत्तेची-
6 JUN 2020 AT 14:20
रायगडाची भव्यता
महाराजांची दिव्यता
सोहळ्याची नवलाई
क्षणा क्षणाला अपूर्वाई
शहा-जिजाऊंची पुण्याई
आलिया फळास
क्षितिजा पल्याड तेज़ जयाचे
चांदण्या मिनमिनत स्वागत करती तयाचे
नाद शंभुचा भगवा करतो आसमंतात
ध्यास एक श्वाश एक "अखंड स्वराज"
तेजसुर्य छत्रपती राजा वाहतो आजही नसानसांत
-