आरश्यात एकदा नक्की पहा
प्रतिबिंबित चेहरा तुझा दिसेल,
भाव तुझ्या मुखावरचे सारे टिपून
आरसा गाली खुदकन हसेल..
लाचार मनास तुझ्या पाहून
तो ओक्साबोक्सी रडेल,
संवेदना वेदना जाणता तुझ्या
तुझीया हृदयाचे तोही दुःखावेल..
उलाघाल थांबवता तुझ्या मनाची
अंतःकरणातून तोही भांबावेल,
मर्म जाणता अजाणतेने तुझे
नात्याचा रेशीम बंध बांधेल..
संयम चिकाटी ठेऊन कयास कर
सांगून प्रेमाने हात हातात धरेल,
तेजोमय प्रीत त्याची पाहून
चेहरा तेजस्वी हर्षाने फुलेल..
-
वाऱ्यावर निरतिशय प्रेम करणारी
ती एक अलवार रेशमाची पाती..
स्वच्छंद, बेधुंद होऊन बरसणारी
ओंजळीत पावसाला झेलणारी वेडी..
विस्तीर्ण आकाश कवेत घेणारी
ती एक अल्लड खळखळणारी नदी..
नाजूक, सुगंधी ती सुमनापरी
वाऱ्यालाही वेड लावणारी एक कळी..
-
राहिले रे अजून ध्यास किती
जीवनी ही अधिक आस किती..
आजचा हा पहार आसवांचा
आजच्या तारका उदास किती..
मी कसे भाव थांबवू ग माझे
गुपीतांचा इथे सुवास किती..
सांग माझे सुरील गाणं गाऊ
गंध रंधास आसपास किती..
ओळखीचे कुणी ग नाही आता
ओळखीचा तरीहि भास किती..
हा तुझा उंबरा मनात राही
मनी हे रंगते कयास किती..
सोबतीला जरी ग तुझी माया
जीवनी हासरी मिजास किती..-
एक एक अक्षर ही
नव्याने गुंफू
शब्दमाळ ही...
कल्पकता भाव हे
मनी रुजवू
प्रेम काव्य करू हे...
उलघडवू सार
मनातले ते
झेलू शब्दांचे वार...
आज व्यक्त मी होते
उमलवते
प्रेम तुझ्यावर ते...
समजुन घे रंग
उतरव ते
जीवनात घे संग...
-
प्रत्येक प्रेमपत्राचं
आपलं एक नशीब असतं...
कधी जपून ठेवलं जातं
तर कधी जाळलं जातं...
-
त्याचं अस्तित्व असतं
फक्त ते जगजाहीर नसतं
मनाला ते मान्य तर असतं
पण स्वीकारायचं मात्र नसतं..
अपेक्षांचं ओझं नेहमी
त्याच्याही खांद्यावर असतं
त्याकडे सोयीस्कर मात्र
दुर्लक्षच केलं जातं..
नात्यांची धुरा
तो ही सांभाळतो
पण तरीही
तो कुठे काय करतो..?
सगळ्यांची काळजी
त्यालाही असते
नात्यांची ओल
त्यालाही कळते..
घरासाठी झटणारे
दोन हात त्याचेही असतात
कधी कधी त्याचेही
पाय खचतात..
अडचणींचा सामना
तो ही हसत करत असतो
पण तरीही
तो कुठे काय करतो..?
-
मळशील माखशील बरबटशील गलिच्छ अपशब्दानी तू जरी,
सत्याची कास अन् ध्यास सोडू नकोस..
भिजशील थिजशील हरशील घर्माच्या पराकाष्टनिय श्रमाने तू जरी,
पाऊल टाकते मागे घेऊ नकोस..
जळशील पेटशील रडशील अथक द्विद्विक अंगारांच्या जळत्या वारानी तू जरी,
डगमगून घाबरून तू जाऊ नकोस..
मोडशील तुटशील भेदाळशील तू शब्दांच्या नीर्थक उच्छक माऱ्यानी तू जरी,
कोलमडून झुकून तू हार मानू नकोस..
ठेसालशील पडशील गुदमर्शील तू या प्रवाहात स्वतःला पटवून देताना जरी,
दुखऱ्या मनाने बैचेन होऊन तू बसू नकोस..
हेरशील हसशील जिंकशील तू नक्कीचं या प्रवाहात एक दिवस,
गहनता,अर्थकता,मर्म सत्यातले घे जाणून मात्र पुढे मार्गक्रमण करण्याचे टाळू नकोस..
-
कधी जर
चुकला रस्ता
नको डगमगू...
ठेव विश्वास
स्वतःवर एकदा
मनाने नको खचू...
-
सुख ओसंडून
वाहत असतं
तरीही काहीतरी
कमी वाटतं...
सुखात न्हाऊन
निघण्याऐवजी
आपण करत
बसतो काळजी...
सुखाचा सदरा
जरी मिळाला
तरीही मनःशांती
का नसते आपल्याला..?
-
एक कप चाय जिंदगी के साथ ली जाए
कुछ वो कहे, कुछ अपनी भी सुनाए...-