प्राजक्ता जोशी  
195 Followers · 58 Following

read more
Joined 28 October 2018


read more
Joined 28 October 2018

उंच आकाशी
मनसोक्त विहरायचंय

होऊन पतंग
आकाशाला कवेत घ्यायचंय
मनाप्रमाणे स्वैर झुलायचंय

-



गोडवा गुळाचा,
स्निग्धता तिळाची,
अशीच राहो नाती
जशी जोडी तिळगुळाची

उंच उडणारा पतंग
प्रतिक विश्वासाच्या यशाचं
आपल्यात सदैव राहो
नातं विश्वासाचं, आनंदाचं

-



खूप काही आहे
मनात साठलंय
ओठांवर येण्यासाठी
आसुसलंय

ते सारं आहे मनात
भावनांनी जपलंय
ओठांवर येऊन
मात्र थांबलंय

-



थकले मन माझे जरी
हार मी पत्करली नाही
जिद्द हि आनंदात जगण्याची
मी अजून सोडली नाही

-



Life gives second chance always
Only condition is
Be alert all time

-



घुसमट विचारांची
काळीज चिरत जाते
अनेक प्रश्नांची काळजात
श्रुंखला तयार होत जाते

-



किती दिस सरले
किती दिप आशेचे
असेच विझले

तरी आस भेटीची
जपली मी उरी
अशाच एका वळणी
भेटशील कधीतरी

-



तो फक्त माझा भास होता
मनात दडलेला कुठेतरी
तो एक भीतीचा श्वास होता

-



मुखवट्यावर मुखवटे
अनेकांनी चढवले
स्वतःचाच खरा चेहरा
आता तेच विसरले

-



नयनात आज तुझ्या
मौनातले भाव होते

पापण्यांत दडलेले माझ्या
गहिरे त्याचे अर्थ होते

उसवलेल्या श्वासांना तुझ्या
पुन्हा नव्याने विणले होते

एकाच त्या आशेवर माझ्या
स्वप्नांना थांबविले होते

वेडावल्या मनाला मी
पुन्हा समजावले होते

दूर जाणाऱ्या सावलीला
हरतांना पाहिले होते

-


Fetching प्राजक्ता जोशी Quotes