तु प्रेमात पडावं म्हणुन लिहितो
असं काही नाही हां
खरं तर तु प्रेमात पडली आहेस
म्हणुनच लिहितोय-
रुपडं देखणं तुझं
या ओंजळीत मावेना
सांग कुठं ठेवावं
काहीच उमगेना
भारी काळजात बसवावं
तर राग येई डोळ्यांना
हळुवार जपावं
जणु लाली न पुसना
रुपडं देखणं तुझं
या ओंजळीत मावेना-
मन लावून वाच
माझी प्रत्येक चारोळी l
मिटून जाईल बघ
तुझ्या माझ्यातील दूरी ll
शब्दांत गुंफलेत भाव
जे होते अंतरी l
दुसऱ्यासही मन असतं
हे जाण कधीतरी ll
© Sanket
-
मेहंदीच्या तळ हातावर तुझ्या
फुलपाखरं विसावी
नक्षत्री नयनात तुझ्या
रंगांची उधळन व्हावी
बंधिस्त डोळ्यांत माझ्या
तु शांत निजावी
मिठीत शिरता तु
अलगद विरघळावी-
मी लिहीत असतो
तू वाचावस म्हणून l
जुन्या आठवणींना नकळत
वेचावस म्हणून ll
©® Sanket-
उन तमाम गुस्ताखियों के संग वो गुस्ताखी भी माफ कर देना
जो तुम्हारी गालों से शुरू होकर, गीले लबों पे खत्म होती है-
तुझ्या सानिध्यात
या मनाला बहर येतो
थोडा का होईना
पण तुला स्पर्शुन जातो
काजव्यांच्या शामियान्यात
चन्द्र तुला न्याहाळतो
मी मात्र रात किड्यांना
जागवत रात्र काढतो-
माझ्या ओठांतील निरागस अभंग तु
सात्विक्तेची निर्मळ अजान तु
एकमेकांत गुंफून ठेवणारी दुआ तु
तु निश्चल निर्विकार माझा ईश्वर तु
-प्रविण-
खाजगितल्या क्षणांची सोबती तु
थोड़ी अल्लड थोड़ी मिश्किल
उनाड वारा मी अन झुलुक तु
लाजरी तु सखे नी बावरा मी
-
मी: एवढ्या उन्हात चहा पितेस..!!
ती: भर थंडीत ओठांवर चॉकलेट्स वितळवण्याची भाषा करणारा तु, शांतच बस..!!-