Pravin VishnuBala Lokhande  
208 Followers · 75 Following

read more
Joined 16 March 2017


read more
Joined 16 March 2017
20 MAY 2022 AT 8:08

उन्हाच्या तप्त धारा झेलत असताना तुझं येणं झालं,
अगदी शरदेच्या चांदण्यासम तुझं बरसणं झालं
मी कितीही बांध उभारला अवतीभवती
सारचं काही उध्वस्त करून तुझं येणं झालं

-


2 SEP 2017 AT 17:19

श्वास अंतरीचा सये
तुझ्यात श्वासात गुंततो
रंग अंतरीचा सये
तुझ्या रंगात रंगतो
बरसुनी मेघा सम तु
कोरडा मी राहतो
तुझ्या नजरेत मात्र
आकंठ मी न्हाहतो

-


22 AUG 2017 AT 0:34

या मीठीतली तुझी तल्लीनता पाहून
कधी कधी माझाही तोल सुटतो
जबाबदार तु असताना
शिक्षा मात्र मीच भोगतो

-


14 AUG 2017 AT 21:12

खाजगितल्या क्षणांची सोबती तु
थोड़ी अल्लड थोड़ी मिश्किल
उनाड वारा मी अन झुलुक तु
लाजरी तु सखे नी बावरा मी

-


3 JUL 2017 AT 21:53

तुझ्या सानिध्यात
या मनाला बहर येतो
थोडा का होईना
पण तुला स्पर्शुन जातो
काजव्यांच्या शामियान्यात
चन्द्र तुला न्याहाळतो
मी मात्र रात किड्यांना
जागवत रात्र काढतो

-


26 JUN 2017 AT 17:32

मेहंदीच्या तळ हातावर तुझ्या
फुलपाखरं विसावी
नक्षत्री नयनात तुझ्या
रंगांची उधळन व्हावी
बंधिस्त डोळ्यांत माझ्या
तु शांत निजावी
मिठीत शिरता तु
अलगद विरघळावी

-


25 JUN 2017 AT 12:40

गंध तुझ्या प्रेमाचा स्पर्शात दरवळतो
ऊब तुझ्या मायेची मिठीत कुरवाळते

-


22 JUN 2017 AT 23:31

तु प्रेमात पडावं म्हणुन लिहितो
असं काही नाही हां
खरं तर तु प्रेमात पडली आहेस
म्हणुनच लिहितोय

-


21 JUN 2017 AT 14:42

रुपडं देखणं तुझं
या ओंजळीत मावेना
सांग कुठं ठेवावं
काहीच उमगेना
भारी काळजात बसवावं
तर राग येई डोळ्यांना
हळुवार जपावं
जणु लाली न पुसना
रुपडं देखणं तुझं
या ओंजळीत मावेना

-


21 MAY 2017 AT 10:29

पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडतोय
तु आश्चर्य नको वाटुन घेऊस
मी पुन्हा तुझ्यात गुंततोय

-


Fetching Pravin VishnuBala Lokhande Quotes