QUOTES ON #रक्ताची

#रक्ताची quotes

Trending | Latest
22 JUL 2020 AT 9:47

... रक्ताची नाती...
. ...सोडून गेलेली माणसे, आणि त्यांनी दिलेले दुःख आजही जिवंत आहेत, ते सांगावे तरी कुणाला, प्रत्येकजन आप आपल्या कामात खुश आहेत, कुणास का म्हणावे, रक्ताची नाती सुद्धा रंग बदलत आहेत... ...चेहरा एक..मुखवटे अनेक, त्यास ओळखावे तरी कसे प्रत्येकांचे अभिनय फार छान आहेत, त्यांची मने घाण आहेत, ते दुसरे कुणी नाहि आपल्याच फांदिचे पानं आहेत, कुणास का म्हणावे, रक्ताची नाती सुद्धा रंग बदलत आहेत... ... चांगले की वाईट, सगळे सारखेच आहेत, हि वजन बघुन झुकणारी नाती आहेत, आज चांगले तर उद्या वाईट आहेत, खरं तर हे माझ्या अनुभवांचे बोल आहेत, कुणास का म्हणावे, रक्ताची नाती सुद्धा रंग बदलत आहेत... ...आपले म्हणावे की परके, मानसाला मान त्याचा धन बघुन देत आहेत, एकाला उच्च तर एकाला निच समजत आहेत, आज कळलं नाती ही किलोकाट्या सारखिच डोगली आहेत, कुणास का म्हणावे, रक्ताची नाती सुद्धा रंग बदलत आहेत...

-


15 JUN 2021 AT 8:35


काही नाती निसर्गतः रक्ताची
मायेच्या धाग्याने बांधलेली
अतुट बंधन आपले मानवी नाते
काही नाती जुळतात मानलेली
थेंब थेंब रक्ताचा जीव वाचवतो
रक्तदानाने जीवनदोर सावरलेली

-