अजून कुठे दरवळला
रातराणीचा सुगंध
अजून कुठे सरला आहे
उत्तर रात्रीचा आरंभ...
आत्ता कुठे मोहोरले
केवडयाचे रान
आत्ताशी कुठे रात्र
विसरली देहभान...
आता मनामोराचा
रंग पिसारा फुलेल
कवितेच्या अंगावर
वसंत नक्की बहरेल!!
-
1 JUN 2021 AT 22:40
10 JUN 2019 AT 18:01
आशेवर सुकलं
एक हिरवगार झाड
आता बरसल मेघराजा
नाहीतर नंतर पडलं.....
कुठे लपली पावसाची झड
कुठे गेली मेघसाऊळ
ये लवकर माझ्यावरती
आणि तडऽतडऽतडऽ पड.....
अंत पाहू नको आता
सुकलो आहे रे मी प्राण दाता
सहा महिने कोरडे आहेत
वाहणारे अनेक स्त्रोत.....
माय धरणी भेगाळली
वाट तुझी तिनेही पाहिली
दुनियेत तुझाच गाजावाजा
आत्ता बरस मेघराजा.....
कवी: आकाश कदम
-
26 FEB 2021 AT 9:51
आत्ता आलेत, आत्ताच आलेत
पण खरंच का ते एकरूप झालेत ?
विचारांच्या दुनियेतून कधीच बाहेर गेलेत
पण तरीही ते आत्ताच आलेत ....-