"मुलगा झाला ,मुलगा झाला,
जिजाऊ साहेबांना मुलगा झाला,
'शिवनेरी' गडावर एक
तेजस्वी सूर्य जन्माला आला
तोच शिवबा माझा
'रयतेचा जाणता 'राजा"
-मन भरारी...$
-
19 FEB 2019 AT 13:09
15 FEB 2020 AT 15:04
यवनांनी धरतीस त्रागले,
कैक युगे रयतेस नाडले,
त्यासवी भूवरी स्फूल्लिंग जागले,
"शिव रूपाने"...
होऊनी दुर्जनांचा काळ,
मनी सज्जनांचा कैवार,
उजळले धरणीचे भाळ,
जाहला अनंत चेतनांचा आधार,
"श्रीमंत योगी"...
केला सह्याद्रीचा कडा उंच ज्याने,
रोविली स्वराज्य मुहूर्तमेढ ज्याने,
उद्धारली कोटी कुळे ज्याने,
ऐसा सकळं जनांसी साजा ,
"जाणता राजा"...-