जगणं ते हक्काचे उमगुन
जगता यायला पाहिजे,
क्षणभर थांबून जरा
स्वतः ला न्याहाळता यायला पाहिजे.....
होय थोड तरी हा होईना
आपल्यासाठी आपण वेड व्हायला पाहिजे.......-
जीवन में तकलीफे कम नहीं
पर अभी कोई गम नहीं,
मिल गया हे मकसद जिंदगी का
खुदपे अब कुछ भी इल्जाम नहीं
लड़ना है खुद से खुद के लिए
गैरों का यहा नाम नहीं
मेरा अपना एक है साथ
बेफिजूल रिश्ते का
अब कुछ काम नहीं....
-
जेव्हा आपल्याच मनाशी आपल्या विचारांच युद्ध सुरू असत,
पण त्या विचारात कुठ व्यक्त झालं की आपल्याच खऱ्या स्वभावाची गळचेपी होते.-
स्वतःची पात्रता ओळखून
म्हणजेच काय तर पायरी समजून
किंवा पायरी होऊन जगणं
कमीपणाचं कधीच नसत.
पायरी ला पायरी समजते
पण त्याच पायरीवर
पाय ठेवल्याशिवाय कळस
गाठता येत नाही,
हे ही तितकंच सत्य.............-
चुकत असतील शब्द माझे
भावना कुठे चुकतात,
वाक्यात शब्दांना गुंफून
मनाला आधार देतात.
तुटक वागणं तुटक वाक्य
मनाला पण तोडून टाकतात,
भावनाना लपवून ठेवलं
पण शब्दातून दिसतात.
अंतर शब्दामध्ये राहूदे
मन भावनेत नको
गुंतलेल्या भावनेला
अबोला शब्दांचा ही नको.....
-
'ओलावा दिला शब्दांचा
तर वेदना पण फुल बनतात,
सुगंधाने सगळा आसमंत
दरवळून काढतात'.
जपल थोड मन
कुठे बिघडत?
घेतला कमी पणा
तर आपलच माणूस
जवळ राहत.
हळूहळू बदलतात
हो बहरतात
थोड नात्यांना जपल
की माणस पण बहरतात..
-
तुझा सावळा रंग
मन माझं मोहून घेतो,
शब्द माझे पण
त्याची कविता तूच होतो.
तूझ्या शब्द सुरात
कृष्णाची बासरी भासते,
आठ बायका असून त्याला
राधाच कृष्णाची वाटते,
कृष्ण दिवा तर
राधा वात होती,
ही अनोखी प्रीती
कशी बर जन्म जन्मातरीची होती...-
जिद्द माझी भरारी घेण्याची
उंच उंच नभात विहारण्याची,
असेल हा निसर्ग साक्षी
अशीच होईल मी एक मुक्त पक्षी......
-
फसवी असतात माणसे
शब्द कुठे फसवतात?
शब्दांमधेच गुंडाळून
रक्त किती आटवतात ?
रक्तच असावं फसवे
नीती त्यांची घाण,
घेऊन कसा फिरतात
पोकळ तो अभिमान?
चाड नसते जाणिवेची
आपली न आपलेपणाची,
भावनाशून्य काळजाला
कसली समजतील नातीगोती.?-
फसवी असतात माणसे
शब्द कुठे फसवतात?
शब्दांमधेच गुंडाळून
रक्त किती आटवतात ?
रक्तच असावं फसवे
नीती त्यांची घाण,
घेऊन कसा फिरतात
पोकळ तो अभिमान?
चाड नसते जाणिवेची
आपली न आपलेपणाची,
भावनाशून्य काळजाला
कसली समजतील नातीगोती.?
-