तर्क शुद्ध विचार करने हे माणूस असण्याचे पहिले लक्षण होय... 🙏
Dr. Nerendra Dabholkar-
20 AUG 2020 AT 13:36
27 JUL 2021 AT 9:25
विश्वासाला जेव्हा तुम्ही प्रश्न करु शकत नाही,
तिथं अंधविश्वास निर्माण होतो.
- डॉ. नरेंद्र दाभोळकर-
29 APR 2021 AT 22:01
कुणी दाभोळकर घ्या
कुणी दाभाडकर घ्या
आम्हाला घेता येतात कुठं?
आणि का घ्यावेत कारण
आम्ही लावलेत चष्मे ...
कुणाचा धर्मवादी
तर कुणाचा पुरोगामी
पण काचा मात्र द्वेषाच्याच
एकामेकांचा वैचारिक
विरोध करताना
द्वेषाच्या विषात
इतके कसे बुडालो
हे कळलंच नाही..
आम्हाला विचारांवर
कुठं चालायचं आहे?
कुठं समाजबदल
घडवायचा आहे...
आम्हाला फक्त वाजवायची
ती घंटा धोक्याची..
पण ती द्वेषाची
आग नाही विझवायची...
ना पुरोगामीत्व ना धर्म
कुणीच बुद्धी प्रदान
नाही करू शकलंय...
आम्हाला करायचं आहे
मनसोक्त त्या दोघांचं प्रतिमाहनन
आम्हाला करायची आहे
चेष्टा त्यांच्या मरणाची...
तो आमचा हक्कच
आम्ही ते करणार
आणि करत राहणार.....-