बुक्का लावू आज भाळा
आहे जो हरीचा टिळा
फुलवू आज मळा
हरिभक्तीचा
आज घेऊ हरिनाम
करू हेची पुण्यकर्म
उदईक पुन्हा काम
शिमगा टिकलीचा-
चरणी ठेवता माथा। पाजे ज्ञानामृता।
हरी भव भय चिंता । गुरुराव ।।
जाती सर्व दोष। अहं न राहे शेष।
आहे महिमा विशेष। गुरुकृपेचा ।।
स्मरावें सदा गुरूनाथा। गुरुपदी ठेवावे चित्ता ।
मनस्वी म्हणे मोक्षदाता । तो श्रीसद्गुरू ।।
-
यारों की महफल के लिए
जरूरत नही हमेशा शराब की
कभी अपने जसबतों को
जुबां पर लाके देखीए जनाब-
कागदावरी शब्दरूप
होवोनिया आले
निर्गुण साकार झाले
परब्रम्ह
मुखी तुझे नाम
करावे हेचि काम
पावावे परम् धाम
पंढरी ते
-
यावे कैसे दर्शन घ्याया
सांगा हो पंढरीनाथा
विषाणूच्या विळख्यातूनी
सोडवी माऊली आता ||धृ||
लादले बहू निर्बंध ते
वैष्णवाने घरीच रहावे
सुना भीमातीर विठ्ठला
तुजला कसा पाहावे
आषाढीस आस दर्शनाची
कशी पुरी व्हावी भगवंता ||१||
नाही वाजले टाळ मृदंग
नाही दिंडी पताका
नाही डोईवरी तुळस
अन् भाळी चंदन बुक्का
मुखपट्टीतच अडला गजर
ना भिडला आसमंता ||२||
मनासी निर्बंध न लागे
मन धावे माहेरासी
ठेवून माथा पदकमली
वाटे भेटावे सावळ्यासी
हरीदर्शनाचा योग येवो
कार्तिकीस तरी आता ||३||
-
संध्यामाईच्या कुशीत जाता
वेदनेला त्या अंकुर फुटती
अंतरीचा डोह ढवळतो
अन् दुःखाला येते भरती
#संध्याकाळ_ग्रेसची_आठवण❤️❤️-
ती होते तिसरी घंटा
लगबग उडते भारी
अन् ऐकू येतो आवाज
झाली का पूर्ण तयारी?
उघडला जातो पडदा
दिसते एक सृष्टी न्यारी
करावी एकदा तरीही
त्या रंगभूमीची वारी
-
मराठीस लाभली बहू कविरत्ने
परी एकचि तो माणिक
कधी तो महाकवी दुःखाचा
कधी संध्यासुक्तांचा यात्रिक
#ग्रेस_प्रेम
-
सिंधू सागरास पुजणारी
पवित्र कोकण भूमी
हृदयात वसला आहे
तो मराठवाडा नामी ||४||
पश्चिमेस गिरीदुर्ग घेऊन
उभे ते सह्याद्रीचे घाट
पूर्वेला जाऊन अनुभवा
सावजीचा वर्हाडी थाट||५||
धारकरी आणि वारकरी
येथे एकत्र चालती पहा
स्वर्गाहुनही प्रिय असा
आम्हा महाराष्ट्र देश हा||६||-
कुणी दाभोळकर घ्या
कुणी दाभाडकर घ्या
आम्हाला घेता येतात कुठं?
आणि का घ्यावेत कारण
आम्ही लावलेत चष्मे ...
कुणाचा धर्मवादी
तर कुणाचा पुरोगामी
पण काचा मात्र द्वेषाच्याच
एकामेकांचा वैचारिक
विरोध करताना
द्वेषाच्या विषात
इतके कसे बुडालो
हे कळलंच नाही..
आम्हाला विचारांवर
कुठं चालायचं आहे?
कुठं समाजबदल
घडवायचा आहे...
आम्हाला फक्त वाजवायची
ती घंटा धोक्याची..
पण ती द्वेषाची
आग नाही विझवायची...
ना पुरोगामीत्व ना धर्म
कुणीच बुद्धी प्रदान
नाही करू शकलंय...
आम्हाला करायचं आहे
मनसोक्त त्या दोघांचं प्रतिमाहनन
आम्हाला करायची आहे
चेष्टा त्यांच्या मरणाची...
तो आमचा हक्कच
आम्ही ते करणार
आणि करत राहणार.....-