रात्री झोपताना असते
वही पेन उशाला
येता तुझी आठवण
लिहून डोळे पुसायला...
-
तिला पाहण्यासाठी मी नकळत
दुसऱ्याला पाहण्याचा प्रयत्न केला,
तिच्या नजरेने अगोदरच
माझ्या नजरेला इशारा दिला...-
ऋतू निराळे घेऊन ये तू , नवीन वर्षा
अम्हा चांगले दे तू हेतू , नवीन वर्षा
जरी किनारे विलग जाहले बघता बघता
माणुसकीचे बांधू सेतू , नवीन वर्षा...
आपणांस व आपल्या परिवारास
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... 💐🎉🌹
💐शुभेच्छुक:- ग.ब.साबळे-
टीका टिप्पणी मान-अपमान
आता थोडं सोसलं पाहिजे
कवी आहे ना मी
आता जपून वाचलं पाहिजे
- ग.ब.साबळे-
तुला पाहण्या
तुझ्या घराकडे येऊ का ?
तुला रोजच पाहावं वाटतं
सांग तुझ्या घराजवळची
खोली घेऊ का ?
- ग.ब.साबळे-
दुसऱ्या बद्दल आपण
उगाच अंदाज लावत बसतो
पण खरंच...
त्या व्यक्तीच्या
सहवासात आपण आलो
तर मात्र सगळेच
अंदाज गळून पडतात...
-
तू कवितेतून भावना लिहितोस
ती फक्त कविता वाचते
भावना मात्र तुझ्या
उरीच साचते...
-
कसलं न कसलं वेड
अवश्य हवं माणसाला...
ज्याला वेडं होता येत नाही
तो शहाणा माणूस नव्हेच...
- व.पु.काळे-