। बोलाव विठ्ठल । पाहवा विठ्ठल । ❤️
-
"मन पीडित जणू सहस्र विकारी
घेऊ पाहे गगनी उत्तुंग भरारी
मोहमायाजालात रुतले असे भारी
पादचारी असा एकला मी भिकारी
त्यागुनी संसाराची चवच खारी
मन गाई प्रभूनाम जन्म उद्धारी
साधनेची मशाल घेतलिया करी
आलो देवा कराया पंढरीची वारी
तुझिया दर्शनाची भूक केवळ आता उरी
लोप पावती असह्य दुःखे सारी"
दुरूनच पाहता तू उभा रुख्माई संगे दारी
रूप सोजिरे सालस आम्हा भक्तांना तारी"-
नाम तुझे ओठीं
पाऊले चलती
वाट हरीची..
नाद पंढरीचा
साऱ्या जगा मधी..
चला जाऊ पंढरी
आज आषाढी एकादशी...-
जळी स्थळी काष्ठी पाषाणी वारकऱ्यास
जसा फक्त पांडुरंग दिसतो...
तसाच भक्तांच्या भेटीसाठी पांडुरंग ही
कटावर हात ठेवून उभा आतुरलेला असतो...
पायाला भेगा पडल्या तरी पायी वारी करत
विठू नाम घेण्यात तल्लीन हा भक्त होतो...
जणू, टाळ-मृदंगाचा गजर अन् भक्तिमय वातावरणात,
विठ्ठलच त्या माऊलीला हे बळ देतो...
ज्ञानोबा-तुकाराम अशा जयघोषात वारकऱ्यांची दिंडी
पांडुरंगाच्या भेटीला चंद्रेभागेतिरी पादुका घेऊन येते...
हरवलेलं मूल जेव्हा खूप काळाने आपल्या आईला भेटतं,
तसे समाधान वारकऱ्यांना विठ्ठल भेटीनंतर ही मिळते...
भजन-कीर्तन करीत, विठूनामात लीन
भक्तगण वारी करत असतात...
राम कृष्ण हरी म्हणत पालखी घेऊन
पायी वारी करत आपल्या दैवतास भेटतात...-
सावळे हे
रूप रंग ।
माझा सखा
तू श्रीरंग ।
देह भान
झाले दंग ।
हरी नाम
हे अभंग ।
हरी गीत
माझे संग ।
वारकरी
झाले गुंग ।
वृदावन
माथ्या संग।
चंदनात
तुझे रंग ।
ढोल ताशा
हे मृदुंग ।
गजरात
मन दंग ।
संत गाती
नाचे दंग ।
भक्ता संगे
पाडुरंग ।-
चंद्रभागा तिरी जमले वारकरी
हे बोला....
विठ्ठल विठ्ठल श्री हरी ।।धृ।।
माथी चंदन रूप नानापरी
तुळशी गंधानी चैतन्य हारी
हाती पथाका सजली पंढरी
ताशा गजरात सजली नगरी ।।१।।
चंद्रभागा तिरी जमले वारकरी
हे बोला ....
विठ्ठल विठ्ठल श्री हरी ।।धृ।।
माझा सावळा ऊभा विटेवरी
वानी अभंग दुमदूमली पंढरी
योगपिठा आली संत स्वारी
ओव्या फुगळ्या लोटांगन दारी ।।२।।
चंद्रभागा तिरी जमले वारकरी
हे बोला ....
विठ्ठल विठ्ठल श्री हरी ।।धृ।।
विठ्ठल रुक्मिणी दर्शना परी
नेत्र संतुष्टी चरण स्पर्श करी
भक्ति भाव तुजे मंत्रमुग्ध करी
रूप साजेसे सोनसाखळी परी ।।३।।
चंद्रभागा तिरी जमले वारकरी
हे बोला ....
विठ्ठल विठ्ठल श्री हरी ।।धृ।।-
आ रहा हूँ तेरे धाम
छोड़ सारा अभिमान
फ़िर भी हो जाए चूक
तो माफ़ करना हे भगवान...!-
चाले पंढरपुरच्या वाटेवरी,
नामस्मरण घेत भक्त वारकरी,
ताड चिपळ्या मृदुग तुतारी ,
मुखी नाम विठ्ठल श्रीहरी, ।।
विठ्ठल रूख्मीनीच्या दारी,
नाचू लागले वारकरी,
झिम्मा फूगड्या फेर धरी,
आनंदाने बहरली श्रीहरीची नगरी ।।
ऐसे सांगती संत मंडळी सारी,
मुखी नाम घ्या विठ्ठल श्रीहरी,
विसरून जाल दुःख सारी ,
मिळवून घ्याल आंनदाची शिदोरी ।।
महीमा विठ्ठलाचा भारी,
शोभा आषाढीची पंढरपूरची वारी,
सुख येईल आपल्या दारी ,
ही आहे माऊलीची कृपा सारी ।।
जयघोष चंद्रभागेच्या तिरी,
वारीच्या धुंदीत संत मंडळी सारी ,
रंगला किर्तन सोहळा भारी ,
बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी ।।-
चाले पंढरपुरच्या वाटेवरी,
नामस्मरण घेत भक्त वारकरी,
ताळ चिपळ्या मृदुंग तुतारी ,
गजर नामघोष पांढुरंग श्रीहरी ।।
विठ्ठल रूख्मीनीच्या दारी,
नाचू लागले भक्त वारकरी,
झिम्मा फूगड्या फेर धरी,
आनंदाने बहरली विठ्ठल नगरी ।।
ऐसे सांगती संत मंडळी सारी,
मुखी नाम घ्या विठ्ठल श्रीहरी,
विसरून जाल दुःख सारी ,
मिळवून घ्याल आंनदाची शिदोरी ।।
महीमा विठ्ठलाचा भारी,
शोभा आषाढीची पंढरीची वारी,
सुख येईल आपल्या दारी ,
विठु माऊलीची कृपा सारी ।।
भक्त रमली चंद्रभागेच्या तिरी,
वारीच्या धुंदीत संत मंडळी सारी ,
रंगला किर्तन सोहळा भारी ,
बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी ।।-
माय माऊली विठ्ठल माझी,
सोबती रखुमाई...।।
पंढरपुरी वसली अवघी,
माझी विठाई...
हो अवघी माझी विठाई...।।धृ.।।
वारकऱ्याच्या वारीमध्ये,
वाजे टाळ-मृदंग...।।
वारकरी तो माझा गाई,
नामाचा अभंग...
हो हरि नामाचा अभंग...।।१।।
तुझिया चरणी ठेऊनी माथा,
घेतो आशीर्वाद...।।
आज तुझ्या ह्या भक्ता दे तू,
उत्स्फूर्त प्रतिसाद...
हो उत्स्फूर्त प्रतिसाद...।।२।।-