या व्याकुळ क्षितिजा वरती
कोण बरें हंबरती...?
दुःखाचा फुटला पान्हा
या शितल संध्या समयी
आत्ममग्न सृष्टीच्या
बुद्ध ओढ अंतरी...-
"गाव हे फुलांचे होते.. का बकाल झाले?"
संध्याकाळ
हसत नाही
रडत नाही
पसरलेली असते उदास विदीर्ण चेहऱ्याने
सु:खद-दुःखद आठवणीने भरल्यासारखा
चितंनशील चेहरा घेऊन ती उत्तरलीय क्षितिजावर
काहीतरी खोल अंतरंगात अनामिक दुःख दाबून असल्यागत
सुरष्टीचे अजस्त्र रहस्य कळल्यावर अचानक वाचा जावी अशी केविलवाणी
मनांत हुरहूर निर्माण करणार हीच हे काळोखगर्द रूप
नेमकं काय सांगण्याच्या प्रयत्नात असेल...?
जीवनाला जन्म देणाऱ्या
सृष्टीची क्षणभंगुरता...?
की,
मृत्यूला जन्म देणाऱ्या
निसर्गाची निष्ठुरता...?
-
ए ईश्क हमे भी देख जरा
हम बाह पसारे बैठे है
चाहत हमारी भी है कोई
नजर टिकाये बैठे है
ए ईश्क हमे भी देख जरा
ए ईश्क हमे भी देख जरा
हम भी तो प्यार करते है
उनपे जा निसार करते है
ए ईश्क हमे भी देख जरा
ए ईश्क हमे भी देख जरा
क्या हाल बनाए बैठे है
सोना पाए रात को हम
निंद उडाये बैठे है
ए ईश्क हमे भी देख जरा
ए ईश्क हमे भी देख जरा
चाहत कितनी गहरी है
जबसे देखा है उनको
खुद्दको भुलाए बैठे है
ए ईश्क हमे भी देख जरा
ए ईश्क हमे भी देख जरा
हम होश गावाए बैठे है
उनकी एक मुस्कानं पे हम
ऊफ जान गवाए बैठे है.
ए ईश्क हमे भी देख जरा
— % &-
बाबासाहेब
बाबा...
तू दिलेला स्वाभिमान देत राहील ताकद
येथील लबाड नि चांडाळ व्यवस्थेच्या विरोध्दात लढण्याची...
तू दिलेली प्रज्ञा देत राहील ऊर्जा
या सनातन म्हणवणाऱ्या अनैतिक संस्कृतीत नीतिमान होण्याची...
तुझे बोट सूर्याच्या किरणासारखे देत राहील प्रेरणा
तुच्छतेच्या नजरा झेलत गुलमोहरासारखं त्वेषाने फुलण्याची
तुझे बोल सन्मानाचे मुक्त विद्यापीठ पेरीत राहील ज्ञानकण
जे दाखवील वाट अंधारातून प्रकाशात जाण्याची,प्रबुद्ध होण्याची...
.......
-
हातांच्या रेषे मध्ये नाव तुझे शोधू किती?
लाचार आहे प्रित माझी, स्वप्न तुझे पाहू किती?
वाहते बेधुंद वारा तुझ्याच प्रेमाचा, हाय दिवाणा मी त्यात कोरडा नाव्हू किती?
तुझेच स्वर चहूबाजूनी मज झंकाळूनी जाई
बेभान मी तुझ्या वाचूनी चांदरात हि टाळू किती?
आस तुझं भेटण्याची काहीच नाही मीच माझ्या मनाला सांग
समजावू किती?
— % &-
देव अभाग्याचां
सावळा विठ्ठल
भोळ्या भाबड्यांचा
माउली विठ्ठल
मुक्या पाखरांचं
गीत विठ्ठल
राबत्या हाताचं
चीज विठ्ठल
गोरगरिबांचा
दाता विठ्ठल
पोरक्या मनाचा
माता विठ्ठल
दुःख मुक्तीचा
ध्यास विठ्ठल
मार्गदाता मानवाचा
बुद्ध विठ्ठल
जाणतो विठ्ठल
मानतो विठ्ठल
पाखंड खोडूनी
सांगतो विठ्ठल-
जिंदगीसे नाराज
कही बेचैन है दिल ,
जैसे कही कुछ खो गया है
ये अहसास, ये सासे
ये मन की तरंगे ,ये बेवजा मुस्कुराना
कही उधार सा है!
जैसे कही कुछ खो गया है!
ये बारीश का मौसम ,ये थंडी हवाये
ये बरसती घटाये,ये भिगिसी राते
कही सुखिसी है!
जैसे कही कुछ खो गया है!
ये झुमते पेड, ये लहराते पत्ते
खिलखिलाते फुल, ये भवरे
कही नाराज से है!
जैसे कही कुछ खो गया है!
ये यादो का अंबर, ये सुनासा आंगण
ये निषछलसी आंखे ,ये भीतर की आवाज
कही गुमसी है!
जैसे कही कुछ खो गया है!
--- योगेश भागवतकर
-
माझ्या समोर
उभे आहेत काही प्रश्न ठाणमांडून
काही व्यवहारी जगणं दुश्वार करणारे
काही निरर्थक मन मोकळं करणारे
काहींचा संबंध थेट रोजच्या जगण्याशी
तर काहींचा मनाच्या अस्वस्थतेशी
कोणत्या प्रश्नांना समोर जाऊ?
वास्तवाशी स्वप्नांचा ताळमेळ बसेना
लाळवलेल्या स्वप्नाना व्यवहार कळेना
घालमेल सगळी...😐
— % &-