आई...
आई सारखे निस्वार्थी प्रेम नक्कीच ह्या जगात शोधून ही सापडणार नाही..
पण, आई सारखी काळजी करणार ह्या विश्वात ही कोणी नाही...-
बेधुंद...
बेधुंद जगावे मुक्त छंदापरी..
गाण्यांच्या शब्दांमधे लपलेल्या भावनांन परी...
वागावे बेभान होऊनी,
कवेत घ्यावे इच्छा ना फुले करुनी..
मृदुगंध घ्यावा श्वासात भरुनी,
पाणी आणि जमिनीचा भाग होऊनी...
पहावे जग मर्यादा तोडूनी,
वागावे फुलपाखरू होऊनी..
जगावे जरी क्षणभंगुर या क्षणी,
या क्षणाला भरून घ्यावे जीवनी..
असेच राहावे बालका परी मनी,
कर्तव्याच्या बंधनात अडकूनी या जगी....-
बेवजह...
बेवजह हम जिंदगी में आये..
जिंदगी ने प्यार का ख्वाब दिखा दिया..
बेवजह नज़रे मिली, बेवजह इकरार हुआ..
बेवजह बाते हो गई, बेवजह इजहार हुआ..
दिल से दिल बेवजह जुड़ने लगे..
इतना बेवजह हो ही रहा था,
तो कम्बख़त, दिल भी बेवजह टूट गया....
अभी जिंदगी ही बेवजह है...
तेरे इश्क़ में हम भी बेवजह है...-
मैंने तो दिल सिलिया, ये सोचकर..
की, तुझे मुझसे प्यार ही नहीं..
पर, तुमने तो दिल तोड़ दिया था..
ये बोलकर, की तुझ में तो दिल ही नहीं..-
एकांत..
एकांतात असताना सतत तुझी आठवण येते..
पण ,आठवण काढण्यासाठी कधी तुला विसरत च नाही..
एकेका क्षणाला तुझा भास होतो..
प्रत्येक व्यक्तीत तुझीच छटा दिसते..
प्रत्येक प्रेमवीर ना आता मी तुच्छतेने बघते..
विश्वास दुसऱ्यावर ठेवण्याची आता तर बोंबच झालेली असते..
तुझ्या येण्याने एवढे आयुष्य बदलेल असे वाटले असते..
तर, आयुष्यातून कधी तुला जाऊच दिले नसते..
तुझ्या आठवणीने मन सावरते..
पण हे शेवटचे आठवणे हे मनाला सांगते..
पण, परत तेच अन् तेच होते..
आणि स्वतःच्या आठवणीत एकांत घालवते....-
पहिले वहिले प्रेम...
पहिले वहिले प्रेम,
कधीच विसरता येत नाही..
मनाच्या कोपऱ्यात ते सतत तेवत असते..
पहिले वहिले प्रेम,
कधीच भेटत नाही..
ते फक्त प्रेम काय आहे,
त्याची जाणीव करून देत असते..
पहिले वहिले प्रेम,
ते शाळेच्या आसमंतात बहरते..
त्यात मिळवण्याची आसक्ती नसून,
ते खूप निरागस असते..
पहिलं वहिले प्रेम,
ते प्रेमळ इशाऱ्यात बहरते..
ते प्रेम आहे हे ही कळण्यासाठी अवकाश जातो..
पहिले वहिले प्रेम, हे सफल अन् असफल ही होते..
पण..
ते नेहमी मनाच्या कोपऱ्यात अथांग समुद्रसारखे उसळत असते..
-
लाट...
धुंद ती संध्याकाळ..
धुंद तो वारा..
तुझ्या आठवणींचा पडतो सडा..
त्या समुद्रकिनारी, आज मी एकटीच..
त्या वाळूत तुझे नाव लिहिताना..
आज मी एकटीच..
हळूच जवळी लाट आली, तुझे नाव पुसून गेली..
तू सत्यात नाही, भानावर आणून गेली..
अलगद स्मितहास्य करून..
समुद्राकडे बघत बसली..
जगण्याची नवी उमेद..
जणू मला लाटेने दिली...
-
झुळुक..
वाऱ्यावरची झुळुक हलकेच मला स्पर्शून गेली
वाऱ्यावरची झुळुक हलकेच मला स्पर्शून गेली
तुझ्या स्पर्शाची जाणीव हलकेच जाणवून गेली-