waman shende  
23 Followers · 23 Following

Joined 19 May 2018


Joined 19 May 2018
3 AUG AT 17:18

सर्वाना सप्रेम नमस्कार
माझ्या वाढदिवसानिमित्य
आपण दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छांचा
मी अखंड ऋणी आहे.
असेच प्रेम आणी आशिर्वाद
कायम राहतील
अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
आपल्या अमूल्य शुभेच्छांचा
सन्मानपूर्वक आदर करतो.
सर्वांचे मनपूर्वक आभार!!

वारा बेधुंद
दुनियादारीचा गंध,
फुलांचा सुगंध
जन्मोजन्मीचे ऋणानुबंध
आपणा सर्वांना मैत्री दिनाच्या
मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सह
आपले सर्वांचे मनपूर्वक आभार

-


17 JUL AT 20:39

दुखावलेलं मन बोलत नाही,
फक्त गप्प बसतं…
हसताना डोळ्यांत पाणी लपवतं,
आणि सगळं ठीक आहे असं दाखवतं…
पण आतून तुटतंच राहतं…!

-


10 JUL AT 15:32

"माणूस तुटतो तेव्हा रडत नाही,
पण शांत होतो…
आणि हीच शांतता खूप काही सांगून जाते!"

शांततेच्या पलीकडचं दुःख…

काही दुःख इतकी खोल असतात की
अश्रू सुद्धा अपुरे वाटतात.
माणूस जेव्हा थांबतो, बोलणं कमी करतो,
तेव्हा तो तुटलेला असतो – पण फार काही सांगत नसतो.
ती शांतता समजून घेणं हेच खरं नातं असतं

-


14 JUN AT 22:45

सगळेच धडे
शाळेच्या पुस्तकातूनच शिकायला हवेत
असं काही नाही
काही धडे आयुष्य,
नाती व समाज यांच्याकडूनही
शिकायला मिळतात

-


14 JUN AT 22:35

स्वभाव अशी गोष्ट आहे
जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,
कितीही कोणापासून दूर व्हा
परंतु चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी
तुमची आठवण होतच असते.
म्हणूनच
स्वभावसुध्दा माणसाने
कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!


-


14 JUN AT 0:29


कधी सुख कधी दुःख
असाच आहे नियतीचा खेळ,
खेळातील नियम समजेपर्यंत ,
निघून जाते आयुष्यातील वेळ.


-


3 JUN AT 22:18

आजचा माणूस थकत आहे -
पण हा थकवा अंगाला नाही,
मनाला आलेला आहे.
शरीराने नाही,
विचारांनी खचलेली माणसं आज आपल्याच आजूबाजूला फिरत आहेत.
बाहेरून सगळं व्यवस्थित दिसतं —
ऑफिस, मोबाईल, गाड्या,
हसणारे चेहरे, सेल्फी, स्टेटस...
पण आतून?
आतून एक रिकामपण आहे —
खोल, काळोख्या खड्ड्यासारखं.



-


1 JUN AT 9:40

आयुष्यात सापासारखी
बरीच लोकं येतील फक्त
तुम्ही पुंगी वाजवायला शिका.

-


27 MAY AT 21:44

मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो,
हा माझा तो माझा, माझ्या जवळचे माझे,
खरं तर तुमची फक्त वेळ आहे...!
ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे,
नाही तर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे...!

-


25 MAY AT 13:19



जो रिश्ता आपकी
मानसिक स्थिति को खराब करे,
वह कभी भी आपके जीवन को
बेहतर नहीं बना सकता...

-


Fetching waman shende Quotes