भेट..
वाटले नव्हते कधी,
तरी अलगद पडली गाठ..
अन सोबती तुझ्या मिळाली,
जगण्याची नवी वाट..
अजूनही पाहतो आहे,
तिथेच तुझी वाट..
आत्ताच येऊन धडकली,
ती शुभ्र् सागरी लाट..
अधुरीच राहिली ती,
समुद्रावरची भेट..
पुढच्या जन्मी तु,
पुन्हा नव्याने भेट..
-
तिरंगा..
निळा, भगवा,हिरव्यावरून,
उठतो आपापसात नेहमी दंगा..
पण सर्व धर्मसमभावाचा प्रतिक,
भारताचा हा लहरता तिरंगा..
# अमृत महोत्सव..-
दुमदुमला आसमंत टाळ,मृदुंगा संग,
पंढरपुरी चढला भक्तीचा रंग..
हाती चिपळ्या, गळ्या तुळशीमाळा,
हाक देती वारकरी सावळ्या..-
मातृदिन💐
आई तुझा कोवळा अंश मी,
वाढलो तुझ्याच उदरी..
सारे सोबती असताना,
बागडलो तुझ्याच पदरी..
वाढताना आई तुझ्या उदरी,
मिळालं तिन्ही जगाचं सुख..
नाळ लपेटुनी मायेची,
दर्शील ईश्वराच मुख..
शब्द ही सारे थांबले जागी,
व्यक्त करण्या तुझं आई..
तुझे असे उपकार,
जन्मभर फिरणार नाही..-
Happy birthday..वाहिनी🤗
वहिनी म्हणजे सुखाचा सडा,
वहिनी म्हणजे आनंदाचा घडा..
वहिनी म्हणजे वात्सल्याची घागर,
वहिनी म्हणजे प्रेमाचा खळखळणारा सागर..
अशी वहिनी माझी छान,
ठेवते साऱ्यांचा मान..
गाऊन आनंदाचं गाणं,
तीच आमुच्या घराण्याची शान..
वहिनी म्हणजे मायेचा पदर,
जशी सावली उन्हातली..
पसरून साऱ्यांवर मायेचे पांघरून,
अंथरली घरभर सुखाची चादर..-
कोरोना😷🤒🤧
२०२० हे वर्ष कोरोना घेऊन आलं,
नि सामान्य माणसाच जगणं बेजार होऊन गेल..
दिवसेंदिवस माणसांची गळती होऊन राहिली,
अशी साथ या आधी कोणी नाही पाहीली..
शिक्षणासारख्या अमूल्य शाखेचा,
झालाय आज खेळ बाजार..
मोठमोठाल्या शिक्षणसंस्थाना,
झालाय कोरोना आजार..
वर्ष सरून दुसर आलं, तरी गेली नाही साथ,
नाही REMDESIVIR न,Covishield केली नाही मात..
घेऊ स्वतःची काळजी, हे एकच आपुल्या हाती..
पालन नाही केले तर होईल जीवनाची माती..-
तुमच्या आठवणी विना एक क्षणही जात नाहीये..
बस दिवस भर तेच विचार, त्याच आठवणी..
आणि डोळ्यातल पाणी डोळ्यात खेळतय,
लिहायला आज लेखनही सरकत नाहीये,
कारण ती सुद्धा आज सुन्न पडलीय..
मन स्वतःलाच समजावंतय, तरीही मानत नाहीये...
अशा आमच्या लाडक्या मामी ..काल
काळाच्या पडद्याआड गेल्याय..
-
HAPPY DUSSEHRA🍀☘️
सोन्यासारख्या माणसांना,
सोन आज पाठवूया..
दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर,
आनंदी आनंद वाटुया..
-
चहूकडे पाणीच- पाणी,
भिजली धान्याची रास..
कोसळला शेतकरी बाप माझा,
निसर्गानं पळवला घास..-
शिक्षकदिन।।
पुस्तक, पाटी, अन खडू संगतीन,
दिलं ज्याने आम्हाला ज्ञान..
या जगात शिक्षकदिनाचा,
तुमचाच खरा तो मान.. #गुरुजन🙏-