प्रेमाचा धागा ताई तुझ्या
इतका घट्ट असावा
की नजरेत माझ्या
कधी चोरभाव नसावा
राखीचा भार तुझ्या ताई
इतका कमी नसावा
भाऊ तुझा कधीतरी
माणसांमधुन सुटावा-
कधी वाटे
पतंगासवे संक्रातीच्या
उंच गगनी जावे
अन् सोबतीने तुझ्या
स्वछंद नभी विहरावे
कधी वाटे
शुभ्र तिळ होऊनी
मनी तुझ्या सामावून जावे
अन् कोमल हृदयी तुझ्या
आपलाच रंग सोडून यावे
कधी वाटे
गुळासारखे गोड होऊनी
गोडीत तुझ्या न्हाऊन जावे
सुगंधापरी त्या गुळाच्या
आसमंत हिंडुन यावे-
जाधव घराण्याची लेक ती
भोसल्यांची सुन होती
सह्याद्रीच्या वाघाला घडवणारी
स्वराज्याची जननी होती
क्रुर यवनांना जाळून खाक
करणारी मशाल ती होती
मराठयांच्या रक्ता रक्तात भिनलेला
स्वाभिमान ती होती
महाराष्ट्राची लक्ष्मी ती
शुरपत्नी वीरांगना होती
मावळ्यांना वेळोवेळी पेटवणारी
स्वाभिमानी ठिणगी ती होती
राजांनी स्वराज्य घडवले
ही गोष्ट ही खरी होती
पण स्वराज्याला जन्म देणारी
राजमाता जिजाऊच होती-
कधी माई कधी बाई
ती ताई ही तुच आहेस
जन्म देणारी प्रत्येकास
आई देखिल तुच आहेस
तुच तर आहेस
या जगाची निर्माती
तुझ्या मुळेच तर तेवतात
दिव्या मधल्या वाती
तु लक्ष्मी तु पार्वती
ती दुर्गाही तुच आहेस
रणांगणावर लढणारी
राणी झाशीची तुच आहेस
जनसेवेसाठी झुरणारी
सिंधुताई तु आहे
स्त्री शिक्षणासाठी वाहणारी
सावित्री ही तुच आहेस
तुच रमाई तुच रखुमाई
तुच तर आहेस शिवबाची जिजाई
तुच बाई तुच ताई
तुच तर आहे प्रत्येकाची आई-
सांग कधी कळणार तुला
अजून किती छळणार मला
जीवापेक्षा जास्त जपतो ना तुला
फिरता तुझ्या सवे भुलतो स्वत:ला
खुप त्रास होतो सोबत तु नसताना
पायही खुप दुखतात ग पायी चालताना
आज पुन्हा बंद पडली माझी गाडी
यार कुणीतरी ढकलत का थोडी😂
-
उगते हुए सुरज को भी
डुबना पडता है |
दिन ढलने के बाद रात
को भी आना पडता है|
समय और दिन
हमेशा एक सा नही रहता
और वक्त का क्या है
आज उसका है कल तेरा होगा|-
बघता बघता हे वर्ष पण बघ संपल
आयुष्याच्याचं अजून एक पान गळाल
आठवणीत तुझ्या दु:ख
माझं सारं विरुन गेलं
किती सांगितलं तुला तरी
खुप काही राहुन गेलं
-
प्रवासातली जीवनाच्या
अनोळखी वाट ही
अनावधाने जातो कुणी
कुणी जाणूनी पडतो या वाटी
गोड आठवण कुणासाठी
कुणासाठी कडवट अनुभव ही
वाटे प्रत्येकाला हवीहवीशी
प्रेमाची अनोळखी वाट ही
-
No one can defite you,
But also without you,
You Can't winn the world.
It's true that on you alone
You can't get speeded
In long period.
But also no one can
Chers you, yourself.
It's good that Cloud
No have a face!
But in cloud you'll
Loose your face.
-