vishwas ghadse   (✍️विश्वास)
1 Followers · 6 Following

Medical Student 💉💊
Classical singer 🎶
Joined 17 March 2022


Medical Student 💉💊
Classical singer 🎶
Joined 17 March 2022
6 SEP 2023 AT 22:26

कळतच नाही कधी मनाशी मन कस जुळतं पाहता पाहता प्रेमाच फुल फस फुलतं येतात कोणी आयुष्यात आयुष्य वेगळ्याच वळणावर वळतं
अनं आयुष्यभर साथ देण्यासाठी आपल्याला हि कोणी तरी मिळतं...

आयुष्य हे फक्त निरागस प्रेम आणि विश्वासावर टिकुन असतं एकाने समजुन घ्यायचं तर एकाने समजावुन सांगायच असतं अनं आयुष्यभर साथ देण्यासाठी आपल्याला हि कोणी तरी मिळतं...

करतांना ते कळत नसतं आणि केल्यावर ते उमगत नसतं उमगलं तरी समजत नसतं पण आपल वेड मन तिच्याच कडे वळतं
अनं आयुष्यभर साथ देण्यासाठी आपल्याला हि कोणी तरी मिळतं...

खर प्रेम एकदाच होत ते कधीही विसरता येत नाही
शुद्ध हळव्या भावनांच आभाळ अनेकांवर पसरवता येत नाही अस हे प्रेम मनाशी जुळतं
अन आयुष्यभर साथ देण्यासाठी आपल्याला हि कोणी तरी मिळतं...

-


30 AUG 2023 AT 12:08

मोठी लहान शांत खोडकर कशीही असावी
पण एक बहीण प्रत्येकाला असावी...

तुझं माझं नात जरा खास आहे
कारणं तुझं माझ्या जीवनात वेगळ स्थान आहे
तू क्षणोक्षणी आनंदी असावी
पण एक बहीण प्रत्येकाला असावी...

बाबांची राजकुमारी तु आहे
सावली जनु आईची तु आहे
कधी प्रेमळ कधी रागीट असावी
पण एक बहीण प्रत्येकाला असावी...

तू नसली जरी रक्ताची
तरी नाती ही आपुलकी आणि प्रेमाची
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी भेट असावी
पण एक बहीण प्रत्येकाला असावी...

हरवलेले ते गोड दिवस आणि त्यांच्या मधुर आठवणी
आज सार आठवलंय हाताच्या राखी सोबतच
ताई तुझ प्रेम ही मनी साठवलंय
अशी ही इच्छा प्रत्येकाच्या मनी असावी
पण एक बहीण प्रत्येकाला असावी...

-


14 AUG 2023 AT 17:18

दयायचं होत ते मुठीत राहुन गेलं
बोलायचं होत ते गुपित राहुन गेलं
डोळ्यांनी दिसलेल्या या घुसमटीत
मनातलं ते मनातचं राहुन गेल...

तु सोबत जरी नसलीस तरी
तुझा भास होण नवीन नाही मला
पण तु सोबत असतांना
मनातलं न बोलता येण खूप छळतयं मला
हे मनातलं छळण मनाला छळतच राहुण गेलं
मनातलं ते मनातचं राहुन गेलं...

जेव्हा तु बोलायची मी हरवुन जायचो
जेव्हा तु जायची मी व्याकुळ व्हायचो
आधी दुरून मग चोरून तुला पाहायचो
तुला चोरून बघतांना तुझ्या आठवनीत रमताना
तुझ्याशी हितगुत करायचचं राहुन गेलं
मनातलं ते मनातचं राहुन गेलं...

मनातले सारे तुला सांगायला मी नेहमीच ठरवत होतो
समोर तू आल्यावर मात्र मी नेहमीच घाबरत होतो
आता घाबरू नकोस हे मनाला सांगायचं राहुन गेलं
मनातलं ते मनातचं राहुन गेलं...

-✍️ विश्वास



-


10 JUL 2023 AT 21:57

कोणी सोबत नसलं ना
तरी स्वतःच्या सहवासाची सवय असायला हवी!
कसयं कोणीच कोणाला आयुष्यभर पुरत नाही हो...

-


5 JUL 2023 AT 22:10

माणुसकी

अरे माणसा माणसा, काय केली रे अवदशा,
मतलबच्या दुनियेसाठी सोडली माणूसकीची नशा

तुला माणसातील काच वेचुन काढाया सांगितले
तु तर माणसे काढुन काच महलात बसवले

तुझ्या मनावरती आता परदा स्वार्थाचा रे आला
तु इतका नीच झाला मायबापाला विसरला

बरं! इतके सर्व तुझपाशी मग का राहतो उपाशी
आनंनदाने पोट भरण्या साध मनाच्या तृप्तीशी

आता तरी कर विचार या अनमोल जन्माचा
स्वतःची ओळख करुनि चुकव फेरा चौऱ्यांशीचा

-✍️संस्कृती आखरे

-


4 JUL 2023 AT 20:38

तुला भेटण्याची ओढ प्रत्येक भेटीनंतर वाढत जाते
मला फक्त एकचं सांग असे का होते ?

पाहताच तुला तो मोगरा ही फुलला होता
त्याच सोडा हो माझा चेहराही खुलला होता
काय हे वेळ मन तुझ्याकडे वळत जाते
मला फक्त एकचं सांग असे का होते ?

जबरदस्ती ने नको मनापासून साथ हवी
रोज-रोज नको मला एक क्षणाची भेट हवी
आठवणी तुझ्या आठवुन क्षणभर स्वतः‌ला विसरते
मला फक्त एकचं सांग असे का होते ?

तुझ्यासाठी लिहायला बसलो की,शब्दही अपुरे पडतात
जणु विस्कळीत झालेली नाते पुन्हा नव्याने जुळतात
हे प्रेमाचे नाते मला कळेनासे होते
मला फक्त एकच सांग असे का होते ?

-


27 JUN 2023 AT 21:01

आयुष्याच्या प्रवासात खुप गोष्टी घडतात,
पण शेवटी आपण एकटेच असतो
आणि सोबत असतात फक्त आठवणी...

-


19 JUN 2023 AT 12:09



नको तो स्वप्नातला इमला नको तो काचेचा बंगला
तोडक मोडक पण ते आपलं असते
कारण आपलं घर आपलं असते....

जिथे मिळते मला सुख-शांती
ज्याच्या कुशीत मिळते थोडीशी विश्रांती
मला राहायला डोक्याखाली छप्पर असते
कारण आपलं घर आपलं असते....

घर म्हणजे केवळ घर नसते
असल्या जरी चार भिंती तरी जगण्यासाठी विणलेल सुंदर स्वप्न असते
कारण आपलं घर आपलं असते....

घर हे दोघांचं असते ते दोघांनी सावरायचं असते
एकाने पसरवल तर दुसऱ्याने आवरायचं असते
कारण आपलं घर आपलं असते.....

घर एक इवलसं प्रेमाने थाटलेल असते
सुख-दुःख सगळं काही एकत्र वाटल असते
कारण आपलं घर आपलं असते.....

-✍️विश्वास

-


17 JUN 2023 AT 12:46

सोपं नसतं हो कुटुंबाचा बाप होणं
मुखावरती हसु ठेऊन परिस्थितीच ओझं वाहन...

डोळ्यात न दाखवता जो आभाळाएवढं प्रेम करतो
नसतो कधी थकवा त्याला रात दिवसाचा खपतो...

घडा सारख मन त्याचं असतं सदा भरलेलं
घरावरती मायचं छप्पर असतं त्यानं धरलेलं...

मुलं-बाळ सुखी राहावे म्हणून किती खस्ता खातो
छाती त्याची हिमालयासारखी हिमालयासारखा उभा राहतो...

बाप म्हणजे असतो एक अनमोल असा ठेवा
माझ्या अबोल बापाला सुखी ठेव रं देवा...

-


14 JUN 2023 AT 12:35

मन जुळलं ना,की आपोआप आपलेपणाचं नातं तयार होतं... तेव्हा त्या नात्याला माझं म्हणून नाही तर आपलं म्हणून जगता आलं पाहिजे.

-


Fetching vishwas ghadse Quotes