Vipul Lade   (Vipul Lade)
212 Followers · 62 Following

read more
Joined 30 December 2017


read more
Joined 30 December 2017
30 APR AT 0:25

श्वासांमध्ये पाऊस वेडा भिरभिरणारा,
उगा छेडितो अंगावरचे रोम रोम हा वारा!
थेंबांनाही आरस्पानी शब्दांचे दे वंगण,
तू असताना हव्याहव्याशा या  जलधारा।।


तुझ्या मिठीतून ओठांवरती सरकत जाताना,
निसटत येतो गोड मधाचा धुंद शहारा...
पावसातली रीमझीम गाणी तुझी ही वाणी,
मातीचा हा सुगंध म्हणजे तुझा इशारा...
तू असताना हव्याहव्याशा या जलधारा।।


हात तुझा गं हाती घेऊन अबोल मीही,
तुझ्याही नयनी उमटावे अनुमोदन काही,
डोंगर हिरवे, नद्या जराशा लाजून गेल्या,
या प्रेमावर नटून गेला निसर्ग सारा!
तू असताना हव्याहव्याशा या जलधारा।।


आता नको ठेवुस कुठेही प्रश्न जरासे,
ओठांनी बोलून साजरे करू खुलासे,
नियम नको की नको कुणाचे बंधन आता,
मुक्त होऊया नाही कुणाचा इथे पहारा....
तू असताना हव्याहव्याशा या जलधारा।।

-


17 MAR AT 15:52

एक कविता तुझ्यावर कोरायची आहे,
कागदावरच्या सगळ्या कवितांना जळवायचे आहे…..

एक नाव श्वासांमध्ये पेरीन म्हणतो...
अत्तरांना एकदातरी भुलवायचे आहे....!

-


26 DEC 2023 AT 3:10

मिटलेल्या ओठांना सांग काही रितभात,

डोळ्यांनी नुसत्या त्या होतील सारेच घात?

शब्द तुझे अंधुकसे दिसले पण लपलेले,

बास आता एवढा हा कल्लोळही शांत शांत!!!

-


3 DEC 2023 AT 13:58

कोई निकाल ना दे घरसे इसलिए घर जाते नही हम,
कोई निकले हुए को कैसे निकालेगा घर से?

-


29 JUL 2023 AT 16:55

An OVERTHINKER

Thinking all possibilities is not always work. Sometimes quick decisions are needed for some situations.

-


19 MAY 2023 AT 1:24

माफ केले कित्येक बहर चांदण्यांचे,
मी रात्रीला कुठल्याच जागलो नाही.....!

-


27 MAR 2023 AT 2:08

एक शाम तो पक के रात हो जाए,
हर शाम मेरी सुबह तक बदलती नही|

-


4 MAR 2023 AT 2:27

काश के तेरे अधरोंसे छलकता नाम मैं होता,
या कोई बेसब्र वक़्त का अंजाम मैं होता....

मशहूर हो जाता मैं भी किसी खबर की तरह,
यूँ होता के कागज पे तेरा पैगाम मैं होता..

बहता आसमान बोतल में बंद कर देता...
गर तेरी आँखोसे टपकता जाम मैं होता!!

-


2 MAR 2023 AT 2:57

भिंतीवरचा खिळा जुना तो दिसला नाही,
फोटोमधला माणूस बहुदा नको असावा....

-


9 FEB 2023 AT 12:05


हैं खुली कबसे दीवारें, कबसे दरवाजों को काम नही,
चौखट को भी इंतेजार,पर तुम्हारा आने का नाम नही।
और कई सालों से मैंने चाँद को भी देखा ही नही,
आँखों में जब तुम रहते हो, तब जमाना याद नही!!

-


Fetching Vipul Lade Quotes