ओली माती
तिने विचारलं, तुला आवडतो का रे गंध ओल्या मातीचा?
तो म्हणाला, नाही.
ती म्हणाली, नाही? मला तर भारीच आवडतो.
तो म्हणाला, की इतकं काय खास आहे साधासाच वास आहे.
ती म्हणाली तुला नाही कळणार इस्मे काय मिठास आहे.
अच्छा? सांग बरं मला, त्याने विचारलं तिला असं काय आहे?
ती बोलू लागली,
गंध मातीचा मोहवून जातो, सूखावतो पेशीन पेशी
तू कधी थांबून तीचा, नाही झाला सोबती.
जवळी तू येऊन जागवतो स्पंदने कशी?
तशीच माती मला बीलगते या सुगंधातूनी.
तिच्यावर पडताच पाणी नाक माझे खुले,
दीर्घ श्वासातून मग ती माझ्या मनोमनी रूजे.
तुला कधी कळणार नाही,
तू थांबून तिला अनुभवले नाही
अशी ही ओली माती,
रोम रोमत भिलगुन जाई होऊन कावरी बावरी
-
! मनाची छटा - भीती !
दुखः सारे दाटून येते त्या भितीच्या सावलीत,
शब्द सारे अपूर्ण पडती, शांत होता स्पंदने
मन होता सावध जरा तू एकदा विचारी मना
का करी त्या चिंता जिथूनी वात ती पेटत जाते
मन जरासे का सांग त्या गुंत्यात अजुनी गुंतूनी येते
सोडवताना त्या छटा थोडा मनी धीर असो
भीतीच्या त्या कहाण्या सारूनी, सूख सारे पदरी पडो
तू नकोना त्या वाटे जाऊ असे मनाने लाख म्हणो
थोडा पुढे जाता तुलाच दिव्य प्रकाश सापडो.
-
हवाय फक्त सहवास,
घट्ट बिलगून तुला,
शांत मला व्हायचयं
मिठीत राहून तुझ्या,
आयुष्य मला जगायचय.
सोपं नसतं माहीत आहे, सोपं नसतं माहीत आहे,
इतकं सौम्य जगणं,
तरीही मनाचा वादविवाद मला,
तुझ्या डोळ्यांत वाचायचाय.
हे सगळं ठीक आहे, हे सगळं ठीक आहे,
एक फक्त आस आहे,
आयुष्य नामक समुद्राच्या
लाटा झेलताना,
तुझा फक्त सहवास हवा आहे.
-
प्रेम
तुझ्या चाहुलीने मन बेचैन झाले,
तुझ्या नजरेच्या आपुलकीत ते वीसावून गेले
मन दूर जाईल का अशी भीती दाटून येते,
ओठावरचे हसू मला हलका दिलासा देते
शांत नगरीची मज नशा चढते आहे,
लक्ख स्वप्नांनी ती नगरी सजत आहे,
अश्या वेगळ्या जगात मी अबोल अन स्तब्ध,
स्पर्शातून उमगले मज हे सुखाचे बंध.-
There is more to life rather than just craving for romantic relationship....
-
💮मंजिल कभी प्यार की नही होती;
प्यार तो होता है सफर, और
मंजिल होती है चाहतों की।💮-
If you want what you dream,
Loving what you have is first step
towards it-
रात्र
ही आपली वेळ असते अरे
सुन्न शांतता
आणि स्पर्शातून झालेल्या असंख्य गप्पा.
ही आपली वेळ असते अरे
काळोखाची गडद खोली
आपले हात अलगद गुंतती
ही आपली वेळ असते अरे
लाजणारा जीव
आणि श्वासा मधले भास किती
अलगद, अल्लड स्पर्षानी बघ
केविलवाणे शब्द होती
अशीच रात्र सरता सरता
मना काहीशी सुखवून जाते
ही आपली वेळ असते अरे
सुन्न शांतता, अगणित गप्पा,
मिठीत सगळे हरपून जाते.
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
-