आठवावे साठवावे मी तुझ्यातच गुंतत जावे
अन तुझ्या नजरेत मला मी नव्याने ओळखावे-
नकोस भाबडया करुस कल्पना ते भाग्य नाही आपुले
जुन्या काळात कोण कस वागलं ,
अडचणीत कोणी काय केलं
आणि कोण सोबत राहील
कोणी रंग दाखवले
वगैरे वगैरे......
असलं म्हणण्यापेक्षा
जे जिवंत आहेत ते आपले आहेत हे स्वीकारा..
-
"दुसऱ्यांना अक्कल शिकवत वेळ घालवण्या पेक्षा
स्वतः सुधारून वागावं हे ज्याला कळत तो मॅच्युअर..."
-
विष्णूपद....
कॅमेरा & सिनोमेटोग्राफी - विशाल बडके
लेखक & आवाज - विनया उत्पात-
"एखाद्याला त्याच्या
गुण दोषां सोबत स्वीकारणं
आणि जितकी प्रथमतः तितकंच
अखंडत्वाने ती व्यक्ती आवडत राहणं
म्हणजे प्रेम...."-
लालपरी.....
कल्पना - विशाल बडके
लेखिका & आवाज - विनया उत्पात
व्हिडीओ संकलन - Youtube-
तुला पाहताना फुलांनी स्मरावे
तुझे ओठ त्यांच्या भाळी असावे
मिठी चांदण्यांची फुलांनी जगावी
दरवळावे तयांनी दिशांतही दाही
तुझ्या पास येता पाऊसही रुसतो
तुला अठवुनी नव्याने बरसतो........
अबोल तरीही बोलका स्पर्श देतो
अप्रत्यक्ष तरीही फुलांनी निखरतो..
तुझ्या पावलांनी मातीही खुलते
लाजवेल कस्तुरीला अशी दरवळते
कधी तरंगे प्रीत अलगद पाण्यावरी
कल्पनेची होडी विसावे वास्तव किनाऱ्यावरी
खुलावे तिनेही वास्तवाच्या विस्तवतही
तुझी साथ मिळता रम्यता आस्तातही
©वीणा Vinaya Utpat-
"क्षणा क्षणाला उजळत जाव्या आयुष्याच्या वाटा
क्षणभर अंधारातही जणवाव्या मौनांतल्या व्यथा
दिव्यांच्या आरासी पलीकडे
उजळाव काजव्यांनीही सुर्यासम
अंधाराचा द्वेष नको उजेडाच दान हवं..."
-
चांदव्याला जगण्या भरती पुन्हा अली उरी
सागराला साद येते दूर आहे अंतर तरी....
क्षणभरीची ओढ वेडी आयुष्याला लागली
अन जगुनी कोजागिरी काळजाला बधली
बाधा जरी जहाल ही जगण्यातला बहार ही
फुलण्या पुन्हा आतुर रातराणी आज ही....
सांगू काशी तुला मी भाव माझया मनातला
न कळला कधी तुला अनुराग या मौनांतला..-
ओंजळीतली फुले निराळी गंध दरवळे दिशांत दाही
तुझ्या विना दाही दिशांच्या दरवळाचे काय करू मी
सुगंध लेवून प्रेमाचा भेटू पुढच्या जन्मी...
-